आजारपणामुळे आरामासाठी दरे गावात गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मुंबईत परतले.साताऱ्यातून निघण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या ग्रामदैवताचे कुटुंबियांसमवेत दर्शन घेतले. त्यानंतर ते आपल्या गावच्या जुन्या घरी व सासुरवाडीच्या मंडळींना भेटून आले.एकनाथ शिंदे हे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईला निघाले. त्यांचा ताफा हेलीपॅडवर येत असताना वाटेतच बसलेला एका दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने शिंदे यांच्या गाडीकडे धाव घेतली. नेमकं काय घडलं पाहा..