Sanjay Shirsat: एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा प्रतिसाद लोकांचा मिळालाय. भाजपा मोठा पक्ष ठरलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. संजय राऊत यांनी नुकताच मोठी टीका केलीये. आता राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.

तुम्ही अमेरिकेबद्दल सांगा, तुम्ही बांग्लादेशाबद्दल सांगा, तुम्ही अफजल खानबद्दल सांगा एका मिनिटात बोलेल. औरंगजेबच्या कबरीवर जायला सांगा एका मिनिटात पोहोचेल, त्याचा सर्व अजेंडा सेट आहे. अष्टपैलू असा नेता ज्याला आता पक्षप्रमुख बनवायला हरकत नसल्याचे म्हणताना संजय शिरसाट दिसले. ‘गिरे तो भी टांग उपर..’ ही संजय राऊतांची मनोवृत्ती असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, संजय राऊतसारख्या विद्वानाने चूक मान्य केली, हे काय कमी आहे का?. उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे. हेच शहाणपण आता कळणार आहे, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल नव्हत पाहिजे. हे आता त्याला कळाले आहे. संजय राऊत यांना एकनाथ शिंदेंच्या दाढीची चांगल्याप्रकारे कल्पना आलीये. हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते.
संजय शिरसाट म्हणाले, ते ज्या संयमाने घेत आहेत ते अख्या महाराष्ट्र पाहतोय. ज्याप्रकारे संजय राऊत खालच्या पातळीवर जाऊन बोलतायेत, टिका करतात. आज अनेकांचे आम्हाला फोन येतात. साहेब याचे थोबाड बंद करा. पण जर त्यांनी मनावर घेतले दाढीवरून हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग भांडूपच्या डंपिंग ग्राउंडवरच जाऊन त्याला बसावे लागेल, हे त्याने लक्षात ठेवाव असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.