Pune Crime: पेट्रोल चोरीचा संशयवरून चौघांनी घेतला तरुणाचा जीव; पुण्यातील नऱ्हे येथील धक्कादायक घटना

Pune Crime News: पुण्यातील नऱ्हे येथे एका २० वर्षीय तरुणाला उपसरपंचासह तिघांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेनंतर संबंधित तरुणावर उपचार सुरू होते.

Lipi

पुणे (आदित्य भवार): पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे शुल्क कारणावरून गोष्ट जीवावर बेतली जात आहे. संघटित टोळ्यांना राजकीय नेत्यांच्या अभय मिळत असल्यामुळे पोलोस ही हातबल होतानाच चित्र दिसत आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुण्यातल्या नऱ्हे येथे राहणाऱ्या तरुणाला पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून उपसरपंच आणि त्याच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण केली होती. त्याचा उपचारदरम्यान काल रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत्यू व्यक्तीच्या कुटूंबनकडून हाळ हाळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपीना अटक केली आहे. तर उपसरपंच अद्यप फरार आहे.

समर्थ नेताजी भगत (वय: २० वर्षे, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी,अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एडिलेड कसोटीच्या आधी भारताला मिळाली गुड न्यूज; WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण झाले आणखी सोपे
आरोपी गौरव संजय कुटे (वय: २४ वर्षे) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय: २० वर्षे) राहुल सोमनाथ लोहार (वय: २३ वर्षे, सर्व राहणार मानाजीनगर, नऱ्हे) या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Historic Move: युक्रेनमध्ये होणार आणखी विध्वंस; पुतिन यांच्या निर्णयाने जगाचे टेन्शन पुन्हा वाढले, रशियाच्या लष्कराला…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या ऑफीससमोर फिर्यादी यांचा मुलगा समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने ते दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत असताना आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजुन लाथा बुक्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने दोन्ही हातावर, पायावर, पार्श्व भागावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

pune news todayपुणे क्राईम बातम्यापुणे बातम्यापुण्यात तरुणाला मारहाण२० वर्षीय तरुणाचा मारहाणीत मृत्यू
Comments (0)
Add Comment