Dombivli Crime News : डोंबिवलीत धक्कादायक घटना उघड झाली आहे. २३ वर्षीय तरुणीवर गुंगीचं औषधं देत अत्याचार केल्याचं समोर आलं असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण याने पीडित तरुणीला नाष्टा खाऊ घातला. त्या नाष्ट्यात गुंगीचं औषधं टाकून सरबत पिण्यास दिलं. त्यानंतर संबंधिताने महिलेच्या मनाविरुध्द लैंगिक अत्याचार केले. तसेच तिचे फोटो – व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून नंतर ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या लैंगिक अत्याचारामुळे महिला गर्भवती राहिली. यानंतर ही माहिती कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मी मारून टाकीन, अशीही त्याने महिलेला धमकी दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपीची यापूर्वी दोन लग्न झालेली असल्याची माहिती देखील त्याने पीडितेपासून लपवून ठेवली होती. हा प्रकार पीडितेच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याशिवाय गर्भपाताच्या नावाने आपल्याकडून तीन लाख रुपये टप्या-टप्प्याने उकळल्याचा आरोपही पीडितेने तिच्या तक्रारीत केला आहे.
Crime News : सरबतामधून गुंगीचं औषध देत महिलेवर अत्याचार, डोंबिवलीत धक्कादायक घटनेने खळबळ
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले, की दोन दिवसांपूर्वी तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार प्रवीण पान्हेरकर (४२) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपीला अधिक चौकशीसाठी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. लोखंडे अधिक तपास करत आहेत.