Today Horoscope 3 december in Marathi, आजचे राशीभविष्य:
३ डिसेंबर मंगळवार असून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज मूळ नक्षत्र, शूल योग आणि तैतिल करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलेय. पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर सहज मिळतील. कौटुंबिक व्यवसायासाठी जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.
३ डिसेंबर मंगळवार असून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज मूळ नक्षत्र, शूल योग आणि तैतिल करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलेय. पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर सहज मिळतील. कौटुंबिक व्यवसायासाठी जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. रखडलेली कामे पूर्ण केल्याने मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील. ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आईसोबत काही वैचारिक मतभेद होतील. बोलण्यात गोडवा कायम ठेवा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – पैसे उधार मिळतील
आज तुमचा सरकारकडून सन्मान होईल. जुन्या मित्रांची साथ मिळाल्याने नवीन मित्र बनतील. पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर सहज मिळतील. कौटुंबिक व्यवसायासाठी जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा
वृषभ – मन प्रसन्न राहिल
आजच्या दिवशी तुम्ही व्यस्त असाल. जास्त धावपळ केल्यामुळे प्रकृती कमकुवत होईल. तुम्हाला काही समस्या येतील. रखडलेली कामे पूर्ण केल्याने मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.
मिथुन – खर्चावर नियंत्रण ठेवा
आजचा दिवस तुमचा खर्चिक असेल. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. सामाजिक कार्यात शत्रूंमुळे अडचणी येतील. मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील. ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आईसोबत काही वैचारिक मतभेद होतील. बोलण्यात गोडवा कायम ठेवा.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचा पाठ करा
कर्क – मेहनतीचे फळ मिळेल
आज तुम्हाला मेहनतीचे फळ चांगले मिळेल. ज्यामुळे आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टीचे नियोजन कराल. काही काम करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होईल. आज कुटुंबाकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. स्वत:साठी काही पैसे खर्च कराल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
सिंह – चिंता वाढेल.
आजच्या दिवशी सासरच्या मंडळींसोबत तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला तोंडात साखर ठेवून संवाद साधावा लागेल, अन्यथा नात्यात दूरावा येईल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या असतील तर त्रास वाढेल. मानसिक अस्वस्थतेमुळे चिंता वाढेल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
कन्या – कामे वेळेत पूर्ण होतील
आज तुम्ही अवघड कामे कमी वेळेत पूर्ण कराल. ज्यामुळे फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ राहिल. पालकांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभामुळे फायदा होईल. तुमची चिंता कमी होईल. नकारात्मक विचारापासून दूर राहा.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा
तुळ – तणाव वाढेल
आज विवाहयोग्य चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून मान्यता मिळेल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना तणावाचा सामना करावा लागेल. मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहिल. स्वत:साठी वेळ काढाल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा
वृश्चिक – मानसिक अशांतता वाढेल
आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांमधील कलहामुळे मानसिक अशांतता वाढेल. त्यामुळे चिंतेत असाल. वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. रखडलेल्या कोर्टातील केसमध्ये यश मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करा. संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होईल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे १०८ वेळा नामस्मरण करा.
धनु – पोटाचे आजार त्रास देतील
आज तुमच्यामध्ये परोपकाराची भावना निर्माण होईल. धार्मिक विधींमध्ये सहकार्य कराल. तुमचे नवीन मित्र बनतील. पोटाशी संबंधित आजार वाढतील. कोणतेही काम नशिबावर सोडू नका. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा
मकर – तब्येत बिघडेल
आज काही मौल्यवान वस्तू मिळाल्याने आनंदी असाल. घरी पाहुणे आल्याने पैसे खर्च होतील. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. मुलांच्या काही समस्या सोडवाल. सासरच्या लोकांकडून मान मिळेल.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र परिधान करा
कुंभ – नुकसान होईल
आज बुद्धीने काम करावे लागेल. व्यवसायासाठी काही नवीन शोध लावाल. ज्यामुळे फायदा होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर गरजेनुसार खर्च करा. जास्त पैसे खर्च केल्याने नुकसान होईल. जुने मित्र भेटतील. नोकरदारांची पदोन्नती होईल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्त्रोचे पठण करा
मीन – वाद संपतील
सामाजिक क्षेत्रात मनोबल वाढेल. मुलांशी संबंधित काही वाद असतील तर ते संपतील. तुमचे मन प्रसन्न राहिल. नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला जल अर्पण करा