Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम2 Dec 2024, 6:46 pm
आराम करण्यासाठी साताऱ्याला मूळ गावी गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परतले.ठाण्यातील हेलिपॅडजवळ पोहोचताच दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले.दोघांमध्ये हेलिपॅडवरच काही काळ चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करताच तब्येत ठिक असल्याचं त्यांनी सांगितलं.