Numerology Prediction, 3 December 2024 : 3 डिसेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक असून संपत्ती वाढण्याचे योग आहेत.मूलांक 3 असणाऱ्यांनी योजना कोणासोबत शेअर करू नका. मूलांक 4 ला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. मूलांक 5 वर कामाची जबाबदारी वाढणार आहे. मूलांक 7 साठी सुख समृद्धीचे योग तर मूलांक 8 ला कामात अडचण येण्याची शक्यता आहे. मूलांक 9 असणाऱ्यांनी वादविवादांपासून दूर राहा. याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – धनलाभाचा योग, कामात फोकस ठेवा
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक असून संपत्ती वाढण्याचे योग आहेत. तुमचे पेंडींग पेमेंट होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात आळस जाणवेल. तसेच आज तुमच्या स्वभावात निष्काळजीपण वाढणार आहे. तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये कामात फोकस महत्त्वाचा आहे. घरी वातावरण ठिक असेल.
मूलांक 2 – योजना कोणासोबत शेअर करू नका
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. आज एखाद्या व्यक्तीसोबत ओळख होईल, ती व्यक्ती तुम्हाला भविष्यात करिअर किंवा व्यवसायात मदत करेल. तुमच्या योजना कोणा बरोबर शेअर करु नका. तुम्ही एखाद्या नातेसंबंधाबद्दल गंभीर असाल, तर पुढचं पाऊल उचलण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
मूलांक 3 – कामाची योजना यशस्वी होणार
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. एखाद्या नवीन कामाची योजना यशस्वी होऊ शकते. नोकरीत मित्राची मदत मिळेल त्यामुळे कामे मार्गी लागतील. आज तुम्हाला अशा काही व्यक्तींचा सहवास मिळेल त्यामुळे तुम्ही जीवनाबद्दल सखोल विचार कराल. आर्थिक स्थिती चांगली असून गुंतवणुकिचा विचार करु शकता.
मूलांक 4 – प्रत्येक कामात नशिबाची साथ
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्हाला खूप दिवसांपासून कामात बदल करायचा होता त्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन गोष्ट करण्याची संधी मिळेल.
मूलांक 5 – कामाची जबाबदारी वाढते आहे
मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमच्यावर कामाचा दबाव असेल. तसेच विरोधक आज डोकं वर काढतील, त्यामुळे सावध राहा. ताणतणाव खूप वाढतो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करा. काळजीपूर्वक काम करा, तुम्हाला नक्की यश मिळेल.
मूलांक 6 – निर्णय योग्य आहेत, यश मिळेल
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहेत त्यामुळे पुढे जायला हरकत नाही. तुम्ही विरोधकांवर मात करणार आहात. धनलाभाचे योग आहेत. घरात थोडे तणावाचे वातावरण असेल, तेव्हा घरीसुद्धा तुमच नीट लक्ष असू दे. तुमच्या आहाराकडे दुर्लक्ष करणे टाळा, कारण हवामानातील बदल तुम्हाला आजारी पाडू शकतात.
मूलांक 7 – सुख समृद्धीचे योग
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक असून तुमच्यासाठी सुख समृद्धीचे योग आहेत. तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. तुम्हाला आज काही खास व्यक्तीमत्वाचे लोक भेटणार आहेत, त्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. ऑफिसमध्ये काही नवीन भरती होणार आहे त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
मूलांक 8 – कामात अडचण येण्याची शक्यता
मूलांक 8 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही तुमच्या कामासंदर्भात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात नवे प्रोजेक्ट येणार आहेत पण कामाचे नियोजन महत्त्वाचे आहे. आज काही ओळखी होतील पण त्यांच्याबरोबर तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करु नका. सावधगिरीने कामे करा तसेच ताण तणाव फार वाढवू नका
मूलांक 9 – वादविवादांपासून दूर राहा
मूलांक 9 साठी आजचा दिवस कामाच्या बाबतीत ठिक आहे पण जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. मतभेद वाढू देऊ नका. वादविवादांपासून दूर राहा आणि घरातील मोठ्यांचा सल्ला ऐका त्यामुळे जीवनात भले होईल. कामे भरपूर येत आहेत फक्त योग्य नियोजन करून काम करा.