तब्बल ८०० फूट उंचीचा कडा… तरूणांच्या खाली डोकावलं तरी काळजाचा ठोका चुकावा, अशी खोल दरी…चुकून एखाद्याच पाय घसरला अन् तो दरीत पडला, तर वाचायची शक्यता नाहीच…परंतु मावळच्या तरूणांनी ही रिस्क घेतली अन् या कड्याच्या अगदी काठावर जाऊन एक भव्य बॅनर लावला…हा बॅनर नेमका कुणाचा होता? या बॅनरमध्ये असं काय होतं की या मुलांनी जीवाची रिस्क घेतली? हा बॅनर होता अजित पवार यांचा…अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, या मागणीसाठी तरूणांनी ही कृती केलीये.