Moti Shankh Upay : मार्गशीर्ष महिन्यात शंखाचे करा हे उपाय, धनसंपत्ती होईल वाढ, देवी महालक्ष्मी राहिल कृपा

Moti Shankh Upay For Money :
डिसेंबर महिना सुरु झाला की, यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व असते. या काळात महालक्ष्मीच व्रत, गुरुवारचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, या महिन्यात लक्ष्मी देवीचा भाऊ शंख प्रकट झाला होता. यावेळी शंखाशी संबंधित काही उपाय केल्याने फायदा होतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Moti Shankh Upay : मार्गशीर्ष महिन्यात शंखाचे करा हे उपाय, धनसंपत्ती होईल वाढ, देवी महालक्ष्मी राहिल कृपा

Moti Shankh Upay For Dhanprapti:
डिसेंबर महिना सुरु झाला की, यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व असते. या काळात महालक्ष्मीच व्रत, गुरुवारचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, या महिन्यात लक्ष्मी देवीचा भाऊ शंख प्रकट झाला होता. यावेळी शंखाशी संबंधित काही उपाय केल्याने फायदा होतो.
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्णीसाठी महत्त्वाचा असतो. या काळात वैभव लक्ष्मी आणि महालक्ष्मीचे व्रत करुन कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या काळात वैभव लक्ष्मीचा घट बसवून पूजा केली जाते. गुरुवारचे व्रत उद्यापन या वेळी केली जाते.
ज्योतिषशास्त्रात मोत्याच्या शंखाशी संबंधित काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच इतर अनेक फायदे देखील होतात. जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात कोणते उपाय करावे

मार्गशीर्ष महिन्यात हे उपाय करा

मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणावा. हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला आणि शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे.

मोत्याचा शंख घरी आणा

मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दुध आणि गंगाजलमध्ये ठेवा. संध्याकाळी आरती करुन श्रीविष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करावे. तसेच या शंखात अक्षता भरुन मंदिरात लाल कापडावर ठेवावे.

अखंड तांदूळ

जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंठ्याभोवती धागा गुंडाळून मोत्याच्या शंखामध्ये ठेवा. नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा. यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्जापासून सुटका

जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकले असाल किंवा घरात सतत आर्थिक संकटे येत असतील, गरीबीचा सामना करावा लागत असेल तर या सर्व गोष्टींमधून तुमची सुटका होईल. हळूहळू तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे.

नकारात्मक ऊर्जा

मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी मोती शंख लाल कपड्यात गुंडाळून मंदिरात दान करा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदेल तसेच सकारात्मक ऊर्जा वाढेल. जर तुमच्या घराजवळ नदी किंवा वाहात्या पाण्याची जागा असेल तर लाल कापडात मोत्याचा शंख गुंडाळून तुमची इच्छा व्यक्त करा. भगवान विष्णूच्या बीज मंत्राचे जाप करुन शंख पाणयात सोडा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

धनसंपत्ती वाढवण्यासाठी उपायमहालक्ष्मीची कृपा कशी राहिल
Comments (0)
Add Comment