Shiv Sena Leader Gulabrao Patil : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा चालू आहे. आता गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठे भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असे थेट गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. आता गुलाबराव पाटील यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

नुकताच आता एकनाथ शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठे भाष्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले की, बिनसलं काही नाहीये. मुख्यमंत्री दोन दिवसांपासून आजारी आहेत. लोकांना अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत. पण एकनाथ शिंदे यांनी वरून जो निर्णय होईल तो मान्य असेल असे म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री ठेवायला हव अशी आमची इच्छा आहे.
फक्त अॅक्टिंग करतो. हा एकही आमदार पाडू शकला नाही. उद्धव ठाकरे यांना चुकीच्या माहिती दिल्या. जसा चिकनगुनीया तसा हा संजयगुनीया, असल्याचेही म्हणताना गुलाबराव पाटील हे दिसले आहेत. संजय शिरसाट यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. हेच नाही तर संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांचे पाय धरत होते, असाही त्यांनी खुलासा केला. संजय राऊत सतत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.