मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…

Nana Patole on Markadwadi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे.

Nana Patole : मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, पण प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, नाना पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…

मुंबई : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याबाबत घेतलेला निर्णय अखेर मागे घेण्यात आला. प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतली. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे.

नाना पटोले यांचे ट्वीट काय?

मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम! विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Markadwadi : बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय मागे, प्रशासनाच्या दबावाने मारकडवाडीची माघार, जानकरांची घोषणा
मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून?
ईव्हीएमवरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे.
त्याचवेळी मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल. डरो मत!
Eknath Shinde : हॉरिबल राजकारण! काळजीवाहू सीएम एकनाथ शिंदे चक्क विरोधीपक्ष नेतेपदी? भाजपच्या रणनीतीची चर्चा

माघार घेण्याचं कारण काय?

उत्तम जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या भूमिकेसंबंधी ग्रामस्थांशी चर्चा केली. गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की जर मतदानच करु देणार नसतील, आपण पेट्या धरुन ठेवणार आणि ते हिसकावणार, यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करु द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे, त्यामुळे गावकऱ्यांसोबत चर्चा करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Ballot Paper VotingMaharashtra politicsMalshiras Vidhan SabhaMarkadwadiNana Patolesolapur newsउत्तमराव जानकरनाना पटोले मारकडवाडीमतपत्रिका मतदानमारकडवाडी बॅलेट पेपर मतदान मागेराजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment