Vastu Tips In Ganesha : घरात समृद्धी टिकून असेल आणि सुख मिळत नसेल तर वास्तूदोषाचा अभाव समजावा. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्याही घरात सुख-समृद्धी टिकत नसेल तर बुधवारी हे उपाय करून पाहा.
wednesday Vastu Upay :
बुधवारचा दिवस हा प्रथम पूजनीय श्रीगणेशाला समर्पित केला आहे. बुधवारी गणपतीची पूजा केल्याने कुंडलीती बुधाची स्थिती अधिक मजबूत होते. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आला आहे.
घरात समृद्धी टिकून असेल आणि सुख मिळत नसेल तर वास्तूदोषाचा अभाव समजावा. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्याही घरात सुख-समृद्धी टिकत नसेल तर बुधवारी हे उपाय करून पाहा.
श्रीगणेश आणि वास्तू संबंध
श्रीगणेश हा बुद्धीचा देवता आणि अनेक संकंटापासून तारणारा आहे असे म्हटले जाते. त्याच्या कृपेने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. गणपतीचे महत्त्वाचे स्थान हे मुख्य दरवाजा, पूजास्थान आणि स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू दोष दूर करण्यासाठी महत्त्वाचे मानण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी सतत वास्तूदोष निर्माण होत असेल तर श्रीगणेशाच्या मूर्तीने ते नष्ट होऊ शकतात. ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात गणेशाच्या वेगवेगळ्या रंगाच्या मूर्ती वापरल्या जातात. घरामध्ये विविध रंगांच्या मूर्ती विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात.
वास्तूदोष दूर करण्यासाठी उपाय
- मुलांना अभ्यासात अडथळे येत असतील तर त्यांच्या टेबलवर किंवा अभ्यासाच्या खोलीत पिवळ्या किंवा हलक्या हिरव्या रंगाची गणेशमूर्ती ठेवावी. तसेच गणपतीच्या खूप जास्ती मूर्ती ठेवू नका.
- तुमच्या बेडरुममध्ये कोणत्याही देवाची मूर्ती ठेवू नका. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपतीची मूर्ती ही आतील बाजूस ठेवावी. देवाची मूर्ती ही कधीही बाहेर ठेवू नये.
- पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात पिवळ्या रंगाची गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. तसेच नियमितपणे श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा. श्रीगणेशाच्या मंत्रांचे पठण करा. घरातील सुख-समृद्धीवक कधीही कोणाची वाईट नजर टिकून राहात नाही.
- घरामध्ये श्रीगणेशाच्या अनेक मूर्त्या ठेवणे शास्त्रानुसार चुकीचे आहे. त्याऐवजी घरात ओम लिहा.
- धनसंपत्ती किंवा आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीगणेशाची मूर्ती तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवणे उत्तम मानले जाते. तिजोरीच्या डाव्या बाजूला सोंड असलेली श्रीगणेशाची मूर्ती ठेवणे शुभ असते.