Vinayaka Chaturthi 2024 Shubh Muhurat : मार्गशीर्ष विनायक चतुर्थीचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केली जाते. या व्रतामध्ये चंद्राची पूजा करणे वर्ज्य मानले जाते. डिसेंबर महिन्यातील ही शेवटची विनायक चतुर्थी आहे. जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील विनयाक चतुर्थी कधी आहे? गणेश पूजनाचा मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या
Vinayaka Chaturthi 2024 In Marathi:
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते. प्रत्येक चतुर्थीचे तसे वेगळे महत्त्व आहे. शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी तिथी ही विनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.
मार्गशीर्ष विनायक चतुर्थीचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केली जाते. या व्रतामध्ये चंद्राची पूजा करणे वर्ज्य मानले जाते. डिसेंबर महिन्यातील ही शेवटची विनायक चतुर्थी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी रवियोग तयार झाला असून या दिवशी श्रीगणेशाचे स्मरण केले जाईल. हे व्रत केल्याने संकटे दूर होतात, तसेच कामात यश मिळते. जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील विनयाक चतुर्थी कधी आहे? गणेश पूजनाचा मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या.
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी
पंचांगानुसार यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ४ डिसेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल. तर ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार गुरुवारी ५ डिसेंबरला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे.
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त
मार्गशीर्ष विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ९ ते दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी १ तास ४० मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ११ मिनिटांपासून ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी शुभ मुहूर्त किंवा अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी शुभ योग
विनायक चतुर्थीला रवियोग सकाळी ७ वाजून ते सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. यावेळी सूर्याच्या प्रभाव असल्यामुळे जीवनातील सर्व दोष दूर होतील. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी वृद्धी योग तयार होतोय जो दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहिल. त्यानंतर वृद्धी योग तयार होईल. उपवासाच्या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र पहाटेपासून सायंकाळी ५.२६ पर्यंत असेल त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरु होऊन अहोरात्र राहिल.