अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या महायुतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलेली आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस राज्यातच असताना अजित पवार मात्र दिल्लीत पोहोचले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवणाऱ्या महायुतीची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस राज्यातच असताना अजित पवार मात्र दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीला पोहोचल्याचं समजतं.

राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटच्या आधारावर मंत्रिपदं वाढवून हवी आहेत. त्यासाठीच अजित पवार दिल्लीला शहांच्या भेटीसाठी गेले आहेत. पण अद्याप तरी त्यांची भेट झालेली नाही. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेइतकीच खाती मिळावीत यासाठी पक्ष आग्रही आहे. हीच बाब अजित पवार शहांना सांगणार आहेत.
Chandrakant Patil: एकच दादा, बाकींना वादा? चंद्रकांत पाटलांमुळे भाजप आमदारांची धाकधूक वाढली, कारण काय?
विधानसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. त्यामुळे आम्हाला अधिकची मंत्रिपदं देण्यात यावीत, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रसेचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केलं. ‘अजितदादांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक झाली. त्यात आम्ही लढवलेल्या आणि जिंकलेल्या जागांचा हिशोब केला. शिवसेनेला जास्त जागा लढवायला मिळाल्या, त्यामुळे त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले. आम्हाला त्या मानानं फार कमी जागा मिळाल्या. त्यामुळे आमचे कमी उमेदवार निवडून आले. पण स्ट्राईक रेटच्या बाबतीत आमच्यात भाजप १ नंबरला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या, तर शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे,’ असं भुजबळ म्हणाले.
Eknath Shinde: मी तुमच्या जागी असतो तर…; उप होण्यासाठी शिंदेंना ‘वरुन’ आग्रह; परिणामांची दिली कल्पना
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५७, तर राष्ट्रवादीचे ४१ उमेदवार विजयी झाले. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला १२ ते १३ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ८ ते ९ मंत्रिपदं मिळू शकतात. पण राष्ट्रवादीला आता स्ट्राईक रेटच्या आधारे अधिकची मंत्रिपदं हवी आहेत. एकनाथ शिंदे बैठकांपासून दूर राहत त्यांची बार्गेनिंग पॉवर कायम ठेवत असताना आता राष्ट्रवादीनं अधिकच्या मंत्रिपदासाठी व्यूहरचना आखली आहे. भाजप शिवसेनेला गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सेनेकडून अर्थमंत्रिपदाची मागणी होऊ शकते. हीच शक्यता विचारात घेऊन अजित पवारांनी दिल्ली गाठली आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpDevendra Fadnavisncpshiv senaअजित पवारअमित शहाएकनाथ शिंदेछगन भुजबळदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment