भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल! मराठी महिलेकडे हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप

Mumbai News: मराठी चालणार नाही, माझ्याशी मारवाडीतच बोला, असा हट्ट मराठी महिलेकडे धरणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: मराठी चालणार नाही, माझ्याशी मारवाडीतच बोला, असा हट्ट मराठी महिलेकडे धरणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. त्यानंतर या दुकानदारानं माफी मागितली. आपल्याकडून असा प्रकार पुढे होणार नाही, अशी हमीदेखील त्यानं दिली. हा प्रकार दक्षिण मुंबईतील गिरगावात घडला. घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यात संबंधित दुकानदार मनसेच्या कार्यालयात माफी मागताना दिसत आहे.

गिरगावच्या खेतवाडीत राहणाऱ्या विमल म्हसकर काल (२ डिसेंबरला) संध्याकाळी साडे सातच्या सुमारास महादेव स्टोअरमध्ये गेल्या होत्या. खरेदी करताना त्या दुकानदाराशी मराठीत बोलल्या. त्यावर दुकानदारानं मराठीत का बोलता म्हणून जाब विचारला. महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे मारवाडीत बोललं पाहिजे. मराठीत बोललेलं आम्ही सहन करणार नाही, असं दुकानदार म्हणाला. त्यामुळे म्हसकर संतापल्या.
Ajit Pawar: अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला
‘आम्ही मारवाडीत का बोलायचं असा प्रश्न मी दुकानदाराला तीनवेळा विचारला. त्यावर आता भाजपचं सरकार आलंय. मारवाडीत बोलायचं. मराठीत बोलायचं नाही. आता मुंबई भाजपची, मुंबई मारवाड्यांची, असं उत्तर त्यानं हिंदी भाषेत दिलं,’ अशा शब्दांत म्हसकर यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला. म्हसकर यांनी हा प्रकार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातला. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
Eknath Shinde: मी तुमच्या जागी असतो तर…; उप होण्यासाठी शिंदेंना ‘वरुन’ आग्रह; परिणामांची दिली कल्पना
मारवाडी दुकानदाराची तक्रार घेऊन म्हसकर स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेल्या. ते भाजपचे नेते आणि माजी मंत्री आहेत.
‘मी तक्रार घेऊन गेले असताना लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तरं दिली. ही आमच्यात भांडणं लावायचं काम करतंय म्हणाले. या लोढा साहेबांना आम्ही आजपर्यंत पाठिंबा दिला. आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना निवडून आणलं आणि आता ते समोरुन म्हणतात, मी यांना ओळखत नाही. लोढा साहेबांना आमची ओळखच पाहिजे का? तुम्ही आमच्या मलबार हिलचे आमदार आहात. हे पुरेसं नाही का?,’ असे सवाल म्हसकर यांनी विचारले. लोढा १९९५ पासून मलबार हिलचे आमदार आहेत. ते सलग सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Maharashtra politicsmangalprabhat lodhaMNSmns workers beats shopkeeperमनसेमनसैनिकांकडून चोपमराठी बातम्यामहाराष्ट्र राजकीय बातम्यामारवाडी दुकानदाराला चोपराज ठाकरे
Comments (0)
Add Comment