शिवाजी पार्क येथे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण पार पडलं.यावेळी सचिन तेंडुलकर, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.विनोद कांबळी मंचावर येताच सचिन तेंडुलकर त्याला भेटण्यासाठी पुढे सरसावला.कार्यक्रम संपल्यानंतर विनोद कांबळीनं मायेनं सचिनच्या डोक्यावरून हात फिरवल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.