८ निवडणुका आणि तब्बल ४० वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) अमोल खताळ यांनी थोरातांचा….१० हजार ५६० मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले. दरम्यान या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात संवाद साधला. या संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.