पराभवानंतर भावनिक, सभा संपताच कार्यकर्त्यांच्या समोर, बाळासाहेब थोरात अर्धा तास स्टेजवर बसून राहिले!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 10:34 pm

हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, भेटीसाठी कार्यकर्त्यांची दिसणारी तळमळ आणि हसत-हसत हात मिळवणारा नेता…. हे दृष्य आहे संगमनेर येथे काँग्रेसने आयोजित केलेला स्नेह मेळावा पार पडल्यानंतरचे… बाळासाहेब थोरात…. शांत, संयमी, मनमिळावू, समन्वयी आणि राजकारणावर मांड असलेला नेता…. राज्याचे कृषीमंत्री, पशुसंवर्धनमंत्री, महसूलमंत्री अशी अनेक खाती त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणूनही त्यांना ओळखले जातं. त्यामुळे त्यांच्यावर राहुल गांधींनीही अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. मागील आठ विधानसभा निवडणुकीत तब्बल ४० वर्षांपासून संगमनेर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या याच नेत्याचा विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल खताळ यांनी १० हजार ५६० मतांनी पराभव केला. आणि बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धक्काच बसला… या पराभवानंतर आज संगमनेर येथे त्यांची सभा झाली. या सभेनंतर ते जनतेत जात काहिसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांची तळमळ आणि भेटीसाठीची ओढ पाहता आहे त्या ठिकाणीच स्टेजवर बसून राहिले… सभेनंतर जवळपास अर्धा तास ते आलेल्या कार्यकर्त्यांमधे जात हात मिळवत फोटो काढत होते. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय….

Source link

Amol KhatalBalasaheb ThoratBalasaheb Thorat Emotionalsagmaner vidhansabhaकाँग्रेसबाळासाहेब थोरातबाळासाहेब थोरात भावुकसंगमनेर विधानसभा
Comments (0)
Add Comment