सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव राज्यात चर्चेत आहे. लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या प्रयोगाला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार व माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी मारकडवाडी ग्रामस्थांचा अभिनंदन व कौतुक केले आहे. मारकडवाडी पॅटर्न राज्यात आणि देशात राबविण्यात यावा अशी मागणी सिद्धराम म्हेत्रे यांनी केली आहे.