Nagpur Earthquake Breaking News: तेलंगण येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्र बिंदू मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५ किलोमीटर अंतरावर आहे.
हायलाइट्स:
- भल्या पहाटे नागपूरसह विदर्भाला भूकंपाचे धक्के
- ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद
- नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
या भूकंपामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाहीय. या भूकंपाच्या धक्क्याने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. हा भाग गोदावरी फॉल्ट भूकंप क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे जेव्हा जेव्हा भूकंप होतात तेव्हा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्तित भागात याची मोठी झळ बसते. साधारणता १० वर्षांपूर्वी असेच धक्के गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन परिसरात बसले होते. अनेकांनी गाव घरे दारे सोडून मोकळ्या भागात आपले बस्तान बसवले होते. गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती काढण्यात प्रशासनाला यश आले होते. पण आज पुन्हा झालेल्या भूकंपाने १० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची नागरिकांना आठवण आली आहे.