CM Oath Ceremony : मंत्रालयात सौनिक यांचं दालन, रश्मी शुक्ला-मनिषा म्हैसकरांची हजेरी; शपथविधीचा अॅक्शन प्लॅन ठरला
राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होत असून, मंगळवारी प्रशासकीय स्तरावरही त्याच्या आयोजनाची लगबग सुरू होती. नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात मंगळवारी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली.या बैठकीला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शपथविधी संदर्भात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.