सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली.देवेंद्र फडणवीसांसोबत तुम्ही शपथ घेणार का असा सवाल एकनाथ शिंदे, अजित पवारांना करण्यात आला.शिंदे संध्याकाळपर्यंत सांगतील, मी तर शपथ घेणार असं अजित पवारांनी सांगताच एकच हशा पिकला. दादांना सकाळ, संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव आहे असा मिश्कील टोला शिंदेंनी यावेळी लगावला.