Devendra Fadnavis Interesting Facts : राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सर्वात तरुण महापौर, सहा वेळा आमदार, तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांच्या खास गोष्टी.
‘इंदिरा कॉन्व्हेंट’मध्ये शिकण्यास मनाई ते मैं समंदर हूं लौटकर आऊंगा…; नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल या गोष्टी माहित्येत?
२०२४ विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. १ डिसेंबर २०२९ रोजी विधानसभेत त्यांनी मैं समंदर हूं लौटकर आऊंगा… केलेलं हे विधान आता पुन्हा एकादा चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नगरसेवक बनले होते. त्यानंतर वयाच्या २७व्या वर्षी ते महापौर झाले होते.
देवेंद्र फडणवीसांनी केलेलं मॉडेलिंग शूट, थेट दिल्लीतून बोलावणं आलेलं… काय आहे या फोटोमागची स्टोरी
– देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असं बोललं जातं, की ‘आरएसएस मॅन इन बीजेपी’, अपण त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत ज्याप्रकारे कौशल्य दाखवलं, त्यानंतर आता असं बोललं जात आहे, की बीजेपी मॅन इन आरएसएस. देवेंद्र फडणवीस हे वकील आणि संघाचे वचनबद्ध सदस्य आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते सलग सहा वेळा विजयी झाले आहेत.
– ५४ वर्षीय देवेंद्र फडणवीस यांनी लहान असताना इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधानांच्या नावावर असलेली शाळा नाकारली होती. नंतर फडणवीस यांनी सरस्वती विद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी एबीवीपीमध्ये प्रवेश केला. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.
– ५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्यांदा राज्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस वयाच्या २७व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले होते.
– २०२४ च्या निवडणुकीत, फडणवीस यांनी आरएसएसचे सह सरचिटणीस अतुल लिमये यांच्यासह मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणेचा मतदारांशी जोडण्यासाठी प्रभावीपणे वापर केला. त्याशिवाय फडणवीस यांनी मौलाना सज्जाद नोमानी यांच्या ‘वोट जिहाद’ या टिप्पणीला प्रत्युत्तर देत ‘वोट जिहाद’च्या विरुद्ध ‘धर्म युद्ध’चा नारा दिला आणि तो निवडणुकीत प्रभावीपणे चालला.
– फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू हा मुंबई न्हावा शेवासह जोडणारा २२ किमी लांबीचा पूल असे काही महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प आणले.