राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटला. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झालय. पण तिकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार म्हणून आरक्षण देणारे ते होते म्हणून आम्ही त्यांच्याशी भांडलो. कारण मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आरक्षणाचा प्रश्न होता. मी पुढेही भांडणार आहे आणि नुसतं भांडण नाही तर सोडणार सुद्धा नाही. सरकारला गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागतील. त्यामुळे सरकारमध्ये कोणी पण कोणत्याही पदावर बसू दे मी सोडणार नाही. असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ऐकुयात…