पवना धरणात गेले, पाण्यात उतरले, अंदाज चुकला आणि होत्याचं नव्हतं झालं; पुण्यातील हृदयद्रावक घटना

Two Friends Drowned in Pavana Dam : एकाच ठिकाणी नोकरीला असलेले दोघे मित्र पवना धरणात बुडाले असल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Lipi

प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील पवना धरणात दोघेजण बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी ४ डिसेंबर रोजी दुपरच्या सुमारस ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुधिवरे परिसरत ही घटना घडली.

पवना धरणावर गेलेल्या दोघांसोबत काय घडलं?

मयूर रविंद्र भारसाके (वय २५), तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा. पुणे, मुळ, रा. लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर, वरणगांव, भुसावळ) असे बुडाल्या पर्यटकांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होते.
दाराला कडी, मुलाने मागच्या दरवाजाने समोरचं दृष्य पाहिलं आणि… चिठ्ठी लिहून हताश वडिलांचं टोकाचं पाऊल

एकाचा मृतदेह सापडला, तर दुसरा….

मयुरचा मृतदेह सापडला आहे. मात्र तुषार याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. बुधवारी दिवसभर मृतदेह शोधण्याची मोहीम सुरु होती. मात्र त्याला यश आले नाही. गुरुवारी सकाळी ९ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
Crime News : गोणीत बॉडी, कपाळावर टिका… तीन दिवसांपासून बेपत्ता मुलासोबत काय घडलं? पोलिसांना वेगळाच संशय

पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला आणि अनर्थ घडला

याबाबत लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे नोकरीस असणारे मित्र बुधवारी सकाळी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुधिवरे गावच्या हद्दीत पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले. यावेळी ते पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले होते. त्यावेळी पोहताना मयत मयूर आणि तुषार यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील पाण्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

पवना धरणात गेले, पाण्यात उतरले, अंदाज चुकला आणि होत्याचं नव्हतं झालं; पुण्यातील हृदयद्रावक घटना

रेस्क्यू टीम घटनास्थळी, बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू

या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर तात्काळ शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या वतीने येथे बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, याआधीही पाण्याचा अंदाज न आल्याने काही पर्यटकांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

pawna damPune newsTwo Friends Drowned in Pavana Damपवना धरण मावळ तालुकापवना धरणात तरुणाचा मृत्यूपवना धरणात बुडून मृत्यूपुणे बातमी
Comments (0)
Add Comment