New CM Oath Taking Ceremony: राज्यातील सर्व शासकीय एलईडीवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
हायलाइट्स:
- पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
- कलाकार, साधू, संत, नेते, कार्यकर्ते हजर राहणार
- १०० फुटी मंच आकर्षणाचा केंद्रबिंदू

आझाद मैदानातील या शपथविधी सोहळ्यासाठी भव्यदिव्य मंचाची उभारणी करण्यात आली आहे. यात तीन मंच उभारण्यात आले असून १०० फुटी लांबीचा भव्य प्रमुख मंच असणार आहे. त्याशिवाय दुसरा मंच ही १० फुटांचा आहे. तिसरा मंच हा संगीत संयोजनासाठी उभारण्यात आला आहे. प्रमुख मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील उद्योगपती, लाडक्या बहिणी, साधूसंत, कलाकार आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, कलाकर, साधूसंत, लाडक्या बहिणी, तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते अशा सुमारे ४० हजार जणांसाठी आसन व्यवस्था आहे.

दोन हजार व्हीव्हीआयपी प्रवेशिका
शपथविधी सोहळ्याला ४० हजारांची आसन क्षमता आहे. यात लाडक्या बहिणींसाठी राखीव आसन व्यवस्था आहे. तर दोन हजार व्हीव्हीआयपी पासचे वाटप करण्यात आले आहे.