Mumbai Tempreture: मुंबईचा पारा ३७ अंशांवर! सांताक्रूझमध्ये डिसेंबरमधील १६ वर्षांतील विक्रमी कमाल तापमान

Mumbai Weather Update: सांताक्रूझ येथील कमाल तापमान डिसेंबरमधील गेल्या १६ वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान होते तर कुलाबा येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते.

हायलाइट्स:

  • आजही उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज
  • रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता
  • शनिवारनंतर पुन्हा थंडीचा अंदाज
महाराष्ट्र टाइम्स
Temperatures

मुंबई : डिसेंबरमध्ये थंडीची जाणीव होता-होता मुंबईकरांना उन्हाचा ताप जाणवू लागला आहे. बुधवारी मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंश पार गेला असून आज, गुरुवारीही तापमान चढे असण्याचा अंदाज आहे.मुंबईमध्ये बुधवारी सांताक्रूझ येथे ३७.३ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापमान डिसेंबरमधील गेल्या १६ वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान होते तर कुलाबा येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते. सांताक्रूझ येथे बुधवारी सरासरीपेक्षा ३.९ अंशांनी, तर कुलाबा येथे १.८ अंशांनी कमाल तापमान अधिक असल्याचे नोंदले गेले. सांताक्रूझ येथे याआधी सन २००८मध्ये ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. तर, डिसेंबरमधील सर्वाधिक कमाल तापमान १९८७मध्ये ३९.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे याआधी सन २०१६मध्ये ३५.८, सन २०१५मध्ये ३५.५, तर सन २०२०मध्ये ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?
मुंबईमध्ये येणाऱ्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमानाचा पारा चढा आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईकरांना तापमानाचा ताप सहन करावा लागू शकतो, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. आज, गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधीसाठी दाखल होणाऱ्या मुंबईकरांनीही उन्हामध्ये काळजी घ्यावी याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवारी सकाळच्या सुमारास तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तसेच पुणे जिल्हा, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, साताऱ्याचा घाट परिसर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव येथे मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन विरुद्ध दिशांकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मेघगर्जनांची शक्यता निर्माण होऊ शकते. उद्या, शुक्रवारी कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारपासून पुन्हा एकदा थंडीचीही जाणीव होऊ शकेल, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra tempreturemumbai highest temperature ever recordedMumbai news todaysantacruzमुंबई तापमान अपडेटमुंबई बातम्यामुंबई हवामान रिपोर्टहवामान अपडेट
Comments (0)
Add Comment