नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
महायुती सरकारचा आज, गुरुवारी शपथविधी सोहळा होत आहे. यात उत्तर महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. गेल्या सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील अशा सहा जणांना मंत्रिपदे मिळाली होती. यांच्यासह नाशिकमधून डॉ. राहुल आहेर, प्रा. देवयानी फरांदे, नरहरी झिरवाळ यांसारखे दिग्गज नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये किती जणांना संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.