2 गावठी पिस्टल व २ काडतुस जप्त पुणे ग्रामीण एलसीबीची कामगिरी

कामशेत येथून 2 गावठी पिस्टल व २ काडतुस जप्त : पुणे ग्रामीण एलसीबीची कामगिरी.
आज रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत पो स्टे कामशेत गुरन २७१/२०२१ क.३९४ भादवीचे समांतर तपास करीत असताना गोपनीयबातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत NH 4 कामशेत ते लोणावळा कडे जाणारे रोडवर कामशेत खिंडीत मोकळया जागेत ता. मावळ जि.पुणे येथे संशयास्पदरित्या मिळून आलेला *इसम नामे प्रतीक अर्जुन निळकंठ वय २१ वर्ष रा.मु. कामशेत ता.मावळ जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले ०२ गावठी पिस्टल , ०२ जिवंत काडतुस व ०१ मोबाइलसह एकुण किं.रु.
१,२६,०००/- (एक लाख सव्वीस हजार रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरचा जप्त मुद्देमाल व आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
सदर आरोपी हा सराईत असून त्याचेविरुद्ध यापूर्वीसुद्धा अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी १ गुन्हा दाखल आहे
१)कामशेत पोलीस स्टेशन गुरन / २०२१ भा ह का क. ३(२५)
प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो. अप्पर पोलिस अधिक्षक श्री.विवेक पाटील सो.,
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक पद्माकर घनवट पो.उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे सफौ. शब्बीर पठाण, पो.हवा. प्रकाश वाघमारे , पो.हवा.सुनिल जावळे, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा मुकुंद आयचीत, पोना गुरू जाधव, पोशी प्राण येवले यांनी केलेली आहे.

Comments (0)
Add Comment