मुंबईत आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे गटाकडून कोण उपमुख्यमंत्री होणार हे अद्याप स्पष्ट नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी अकरा तारखेला होणार असल्याचे सांगितले जातंय. आता शिवसेना नेते भरत गोगावले यांनी मोठे भाष्य आजच्या शपथविधी सोहळ्याबद्दल केले आहे.
आता आजच्या शपथविधी सोहळ्याबद्दल मोठे भाष्य शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी केले. भरत गोगावले पत्रकारांना बाईट देण्यासाठी येताच काहीजण म्हणाले की, मंत्री आले… मंत्री महोदय आले… परिवहन मंत्री आले…यावर भरत गोगावले म्हणाले, ये झाडावर चढू नकोस थांब जरा…विशेष म्हणजे यावेळी भरत गोगावले हे वडाच्या झाडाखालीच उभे होते. परिवहन मंत्री भरत गोगावले होण्याची शक्यता असतानाच आता त्यांचा हा संवाद चर्चेत आलाय.
एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळात राहवे ही आमच्या सर्व आमदारांची इच्छा असल्याचे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. यावेळी भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केलीये. विरोधकांना निमंत्रण देण्यात आलंय. येणे किंवा नाही येणे हा त्यांचा निर्णय आहे. काल एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना जाऊन आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत असल्याचे स्वत:हून सांगितल्याचेही भरत गोगावले यांनी म्हटले. यावेळी आम्हाला संधी मिळेल, असेही भरत गोगावले यांनी म्हटले.