Devendra Fadnavis: मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना… मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा… भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये विधानसभेत भाषण केलं. त्यातल्या या ओळी सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. वि
मागील ५ वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. समंदर हूं लौटकर वापस आऊंगा, असं म्हणणारे फडणवीस आधी विरोधी पक्षनेते, मग उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता ते मुख्यमंत्रिपद म्हणून ‘पुन्हा आले’ आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सागर बंगल्यावर होता. पण समंदर लौट वापस आल्यानं त्यांचा मुक्काम वर्षावर असेल. मागील ५ वर्षे फडणवीस यांच्यासाठी कसोटीची ठरली. पण त्यांनी अतिशय धीरोदात्तपणे अनेक संकटांना तोंड देत पुनरागमन केलं.
अशी कामगिरी करणारे पहिलेच; फडणवीसांच्या नावावर विक्रम
देवेंद्र फडणवीस यांच्या आधी राज्यानं नऊ उपमुख्यमंत्री पाहिले. फडणवीस दहावे उपमुख्यमंत्री ठरले. उपमुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री होता आलेलं नाही. ती कामगिरी फडणवीसांनी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या नावावर अनोखा विक्रम जमा झालेला आहे. ३० जून २०२२ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं.
आतापर्यंत कोणी कोणी भूषवलं उपमुख्यमंत्रिपद?
काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे, एस काँग्रेसचे सुंदरराव सोळंके, काँग्रेसचे रामराव आदिक, भाजपचे गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर आर पाटील, अजित पवार यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्रिपदी काम केलं आहे. पैकी भुजबळ तीनदा मुख्यमंत्री राहिले आहेत. तर अजित पवारांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यातील एकाही नेत्याला नंतर मुख्यमंत्री होता आलेलं नाही.