Numerology Prediction, 6 December 2024 : 6 डिसेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे, कामे उत्साहात होणार आहेत. मूलांक 2 ची आर्थिक स्थीती ठिक नाही.मूलांक 4 चे ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल.मूलांक 6 चे जातक कामातील कौशल्य आणि उत्साहाने विरोधक किंवा शत्रूंवर मात करतील. मूलांक 8 मध्ये जे व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी प्रवास लाभदायक आहे. मूलांक 9 च्या जातकांनी वादविवादापासून दूर राहावे. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – कामे उत्साहात होणार
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने आणि सकारात्मकपणे करणार आहात. तुमच्या कामातील जोश पाहता तुमचे ऑफिसमध्ये कौतुक होणार आहे. आर्थिक बाबतीत दिवस ठिक आहे. धनलाभाचे योग असून कुटुंबात वातावरण आनंदाचे असेल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल त्यामुळे तुम्हाला प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल.
मूलांक 2 – आर्थिक स्थीती ठिक नाही
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणावरून पेमेंट येणार असेल तर ते थांबेल. त्यामुळे आर्थिक स्थीती आज फारशी ठिक नसेल. वरिष्ठ अधिकारी कामात त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मानसिक ताण तणाव वाढल्यामुळे तुम्हाला त्रास होवू शकतो. तब्येत जास्त खराब आहे असे वाटले तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज तुमची जास्त चिडचिड होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. आज कोणतेही काम करताना सावध आणि सतर्क राहा.
मूलांक 3 – व्यवसायातील नवीन प्रस्ताव स्विकारा
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असून व्यापाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात प्रगती होणार असून नवीन प्रस्ताव येतील त्याचा स्विकार करा तुम्हाला लाभ होतील. तुम्ही आज खूप उत्साहात सगळी कामे करणार आहात. आर्थिक बाबतीत दिवस ठिक असून धनसंपत्ती अडकण्याची शक्यता आहे. कुटुंबात तुमचा वाद होण्याची शक्यता आहे तुम्ही शांत राहा आणि अपशब्द बोलू नका. जोडीदाराकडे मन मोकळे करा त्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 4 – ऑफिसमध्ये कामाचे कौतुक
मूलांक 4 साठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबासोबत दिवस चांगला व्यतीत होणार आहे. जोडीदारासोबत संबंध चांगले असतील. तुम्ही हुशारीने आणि तत्परतेने सगळी कामे व्यवस्थीत मार्गी लावाल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील जे काही वाद होतील ते मिटून जातील. तुम्ही खूप उत्साहाने सगळी कामे आज पूर्ण करणार आहात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमच्या बोलण्याने अनेकजण प्रभावीत होतील.
मूलांक 5 – प्रत्येक कामात नशिबाची साथ
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक असून सासरकडून तुम्हाला अपेक्षीत यश मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत. आज मनात अनेक विचार येतील त्यात चंचलता असेल. तुम्ही यामुळे भरकटू शकता, सावध राहा. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस तुमच्याबाजूने असेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात यश आणि नशिबाची साथ आहे. तुमचे पेंडिंग पेमेंट मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. नोकरदारांसाठी प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत.
मूलांक 6 – विरोधक किंवा शत्रूंवर मात कराल
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक असून भरपूर उत्साहात कामे करणार आहात. तुमचा कामातील जोश आणि उत्साह पाहून शत्रू आज काहीच करु शकणार नाही. सकारात्मक ऊर्जा आसपास असेल तसेच मोठ्या कामांना पूर्ण कराल.व्यापारात लाभ आहे आणि तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे त्यामुळे गुंतवणुकिचा विचार नक्की करा. कार्यक्षेत्रात कामे मार्गी लागल्यामुळे तणाव कमी होईल.
मूलांक 7 – नवीन कामाची सुरुवात सध्या नको
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे पण भावनात्मक निर्णय आणि जोशो उत्साहात कोणतेही काम करू नका, नवीन कामाची सुरुवात शक्यतो आज करु नका. तुम्ही व्यापार विस्तारासाठी गुंतवणूक करु शकता तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. कुटुंबासोबत दिवस ठिक असून जोडीदारासोबत दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. तब्येतीची काळजी घ्या.
मूलांक 8 – व्यापारासाठी प्रवास लाभदायक
मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक असून दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. खास करून जे व्यापार करत आहेत त्यांच्या साठी प्रवास फायदेशीर असणार आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर काळजी घ्या. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून तुमची आर्थिक स्थीती सुधारणार आहे. घरात तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगल्याप्रकारे व्यतीत होणार आहे.
मूलांक 9 – वादविवादापासून दूर राहा
मूलांक 9 साठी आजचा दिवस ओके फक्त तुम्ही वादविवादापासून दूर राहा. कौटुंबिक जीवनता वादाची शक्यता आहे. व्यापारात नीट विचार करुन व्यवहार करा तरच तुम्हाला नफा होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकला. नोकरी करणाऱ्यांचा ताण तणाव वाढेल पण कामात फोकस करा. तब्येतीची काळजी घ्या.