Grah Gochar 2025 Upay :
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. येणाऱ्या नवीन वर्ष संक्रमणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे. २०२५ मध्ये अनेक मोठे ग्रह एकाच वेळी संक्रमण होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर, देशावर आणि जगावर त्यांचा परिणाम दिसून येईल. काही समस्यांना सामोरे जावे लागण्यापूर्वी आपण काही उपाय करायला हवे. हे उपाय केल्याने धनसंपत्ती, सुख-समृद्धीत वाढ होईल.
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. येणाऱ्या नवीन वर्ष संक्रमणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे. २०२५ मध्ये अनेक मोठे ग्रह एकाच वेळी संक्रमण होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर, देशावर आणि जगावर त्यांचा परिणाम दिसून येईल.
२०२५ मध्ये सर्व प्रमुख ग्रह राहू, शनि, मंगळ, गुरु आणि केतू संक्रमण होतील. २०२५ मध्ये आपल्या काही समस्यांना सामोरे जावे लागण्यापूर्वी आपण काही उपाय करायला हवे. हे उपाय केल्याने धनसंपत्ती, सुख-समृद्धीत वाढ होईल.
२०२५ ग्रहाचे संक्रमण
२०२५ च्या सुरुवातीला शनी स्वत:चे राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करेल. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवोश करेल.
मे महिन्यात राहू मीन राशीतून कुंभ राशीत पोहोचेल. १८ मे २०२५ रोजी राहू मीन राशीत आणि केतू सिंह राशीत प्रवेश करेल.
गुरु वृषभ राशीतून बाहेर पडून २०२५ मध्ये मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुचे संक्रमण १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीतून होईल.
२०२५ मध्ये हे ४ मोठे ग्रह बदलणार आहेत. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी काही उपाय करणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी कोणते सोपे उपाय करायला हवे.
शनिचा वाईट प्रभाव टाळण्यापूर्वी
२०२५ मध्ये शनिचे संक्रमण होईल. पाण्यात साखर, काळे तिळ मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करा. हा उपाय सूर्योदयापूर्वी केल्याने शनि तुमच्यावर प्रसन्न होईल.
जर हा उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा. ओम प्रं प्रेमं प्रुम् स: शनैश्चराय नम: या मंत्राचा जप दर शनिवारी किमान १०८ वेळा करावा. हा उपाय केल्याने शनिच्या साडेसातीचा प्रभाव कमी होईल.
तसेच शनि मंदिरात जाऊन तिळाच्या तेलात काळे तीळ मिसळून दिवा लावा. या उपायाने शनिदेवाच्या परिणामापासून आराम मिळतो.
राहू संक्रमण 2025 उपाय
ज्योतिषशास्त्रात राहूला पापी ग्रह म्हणून ओळखले जाते. राहूला प्रसन्न करण्यासाठी उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. १८ मे ला राहू मीन राशीतून कुंभ राशीत जाईल. अशावेळी काही उपाय करणे फायदेशीर ठरतील.
ओम रा रहवे नमः या मंत्राचा जप करावा. पक्ष्यांना दररोज बाजरी खाऊ घाला. शनिवारी काळ्या कुत्र्याला काहीतरी खाऊ घाला. तसेच सोमवारी काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा.
केतू संक्रमण 2025 उपाय
केतू दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी परोपकाराची कामे करावीत. शुभ प्रभाव प्राप्तीसाठी काळे उडीद, कपडे, छत्री, इस्त्री इत्यादी गोष्टी दान करा.
केतूला प्रसन्न करण्यासाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला काहीतरी खाऊ घाला.
दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. या उपायाने केतू प्रसन्न होतो.
गुरु संक्रमण २०२५ उपाय
२०२५ मध्ये गुरुचे मिथुन राशीत संक्रमण होईल. १४ मे २०२५ ला गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुवारी ३, ५ किंवा १६ जपमाळांसाठी ‘ओम ग्रं हरी ग्रां स: गुरवे नमः’ या मंत्राचा जप करावा.
गुरुवारी आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. असे केल्याने गुरु प्रसन्न होईल. घरात सुख-समृद्धी नांदेल.
गुरुला बळकट करण्यासाठी गुरुवारी उपवास देखील करु शकता. विधीनुसार श्रीविष्णूची पूजा करावी.