Mars Retrograde 2024 in Cancer :
नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी मंगळ कर्क राशीत उलटा फिरणार आहे. ७ डिसेंबरला मंगळ राशीत उलटा फिरेल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला धैर्य, शौर्य आणि चिकाटी संबंधितचा ग्रह मानला जातो.
मंगळ जेव्हा चंद्र राशीत उलटा फिरतो तेव्हा त्याचा शुभ परिणाम मिळतो ज्याचा थेट परिणाम राशींवर होतो. तुळ आणि मकर राशीसह मंगळाच्या उलट्या फिरण्याने फायदा होणार आहे. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी तुमचे चांगले दिवस सुरु होतील. जीवनात प्रगती होईल. यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. मंगळाच्या प्रतिगामीमुळे कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया.
७ डिसेंबरला पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांनी मंगळ कर्क राशीत वक्री होईल. त्याच्या उलट्या फिरण्याने अनेक गोष्टी बदलतील. करिअर आणि व्यवसायात मोठे निर्णय घ्या. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी तुळ आणि मकर राशीसह ५ राशीच्या लोकांना अचानक मोठी रक्कम मिळेल. बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर शुभ वेळ आहे. मंगळाच्या वक्रीमुळे जीवनात यशस्वी व्हाल. जाणून घेऊया कोणत्या ५ राशीवर मंगळाचा शुभ परिणाम राहाणार आहे.
कर्क राशीवर मंगळ वक्रीचा प्रभाव
कर्क राशीच्या कुंडलीत मंगळ पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. मंगळ सध्या पहिल्या घरात वक्री होईल. त्यामुळे तुम्ही कामात अधिक व्यस्त राहाल. मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित कराल. तुमच्या फायद्यासाठी नोकरी बदलाल. नवीन व्यवसाय सुरु करु शकता. व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. जोडीदाराप्रती असुरक्षिततेची भावना नात्यात तणाव निर्माण करेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील.
तुळ राशीवर मंगळ वक्रीचा प्रभाव
तुळ राशीत मंगळ वक्री दहाव्या घरात होणार आहे. त्यामुळे कामासाठी प्रवास करत असाल तर यश मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पार्टनरशीपमधून व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभ वाढतील. जोडीदाराशी आनंददायी वागणूक आणि चांगला संवाद साधाल. आत्मविश्वासामुळे आरोग्य चांगले राहिल.
वृश्चिक राशीवर मंगळ वक्रीचा प्रभाव
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ तुमच्या पहिल्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे नवव्या घरात मंगळ वक्री होईल. या काळात तुम्ही सतत नवीन गोष्टींसाठी प्रयत्न कराल. प्रवासातून फायदे होतील. अध्यात्मातून आनंद मिळेल. करिअरमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या आणि यश मिळेल. व्यवसायासाठी लांबचा प्रवास कराल. नवीन संधी मिळतील. परदेशातून आर्थिक लाभ होतील. जोडीदार आणि त्याच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. धैर्य आणि जिद्दीमुळे आरोग्य चांगले राहिल.
मकर राशीवर मंगळ वक्रीचा प्रभाव
मंगळ मकर राशीत सातव्या घरात वक्री होणार आहे. त्यामुळे नवीन मित्र आणि सहकारी बनवाल. करिअरच्या प्रगतीसाठी लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायासाठी नवीन योजना आखाल. मित्रांना पैसे उधार दिल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबत संवाद साधाल. पचनाच्या समस्या असू शकतात. आहाराची काळजी घ्या.
मीन राशीवर मंगळ वक्रीचा प्रभाव
मीन राशीत मंगळ पाचव्या घरात वक्री होणार आहे. त्यामुळे तुमची आध्यात्मिक आवड वाढेल. करिअरमध्ये कठोर परिश्रम केल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त लाभ आणि पदोन्नती मिळेल. चुकीच्या नियोजनामुळे व्यवसायात नुकसान होईल. मुलांच्या प्रगती आणि विकासावर खर्च वाढेल. जोडीदार मुलांवर पैसे खर्च करतील. उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका.