Washing Hair Before Going To Temple: घरातील मोठी मंडळी नेहमी सांगतात देवळात जायचं असेल तर मन आणि शरीर शुद्ध ठेवाव. आंघोळ करून आपण आपलं शरीर स्वच्छ करतो. तसेत सराकात्मक विचाराने मनाचे शुद्धीकरण होते. पुराणात असे ही सांगितले जाते की केस धुऊन मंदिरात जायला हवे. केस धुण्याचा आणि बाह्य शुद्धता याचा सखोल आध्यात्मिक अर्थ आहे, काय आहे तो अर्थ जाणून घेवूया.
शुद्ध देहात वसे शुद्ध मन
शास्त्रात असे सांगितले आहे की शुद्ध देहात वसे शुद्ध मन ! मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी जाताना मन आणि शरीर शुद्ध असणे फार गरजेचे असते. म्हणजे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा त्वरीत आपल्यातही सकारात्मक बदल घडवतता. तुम्ही अनुभवले असेल मंदिरात गेल्या मन किती शांत वाटतं, मंदिरात जेव्हा तुम्ही अनवाणी पायांनी फिरता तेव्हा पायांना एक थंड स्पर्श जाणवतो. मंदिरात आपण बसतो तेव्हा मन हलकं होत आहे आणि नकारात्मक विचार बाहेर जात आहेत असं वाटतं.
केस धुऊन मंदिरात जाता तेव्हा….
जेव्हा तुम्ही केस धुऊन मंदिरात जाता, तेव्हा तुम्ही शरीराशी संबंधित अशुद्धता समाप्त करता. तुम्ही हेअर वॉश करताना केसांवर घेतलेले पाणी फक्त केसांवरील अस्वच्छता दूर करण्यासोबत तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते. केस धुऊन आणि आंघोळ करून मंदिरात गेलं तर आध्यात्मिक उर्जेचा प्रभाव अधिक जास्त प्रमाणात अनुभवता येतो. खूपदा तुम्ही पाहिलं असेल खूप तणाव असतो तेव्हा, तुम्ही शॉवर खाली उभे राहता आणि काही काळाने तुम्हाला बरे वाटते. म्हणूनच मंदिरात जाताना केस धुऊन जाणे उत्तम आहे. यामुळे ध्यानधारणा आणि पूजेत एकाग्रता वाढते. केस स्वच्छ असतील तर शरीराला विविध संक्रमण आणि रोगांपासून वाचवतात.
केस धुणे आणि सहस्त्रार चक्राचा संबंध
डोके आणि केस शरीराच्या वरच्या भागातील “सहस्त्रार चक्र” शी संबंधित आहेत. जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा सहस्त्रार चक्राचे शुद्धीकरण होते. तिथे असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होवून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे तुम्ही ध्यान आणि भक्तीसाठी अधिक एकाग्र होवू शकता. सहस्त्रार चक्राचा थेट संबंध मानसिक आणि आत्मिक शुद्धतेशी आहे. केस धुताना तुम्ही पाण्यात थोडे गंगजल मिक्स करा यामुळे सहस्त्रार चक्र सक्रिय आणि जागरूक होतो. सहस्त्रार चक्र आपल्या ऊर्जा प्रणालीचा केंद्र बिंदू आहे. केस धुणे आणि डोक्याची शुद्धता या चक्राच्या आजुबाजुच्या ऊर्जा संतुलित करण्यासाठी मदत करतात. लक्षात ठेवा, पाणी शुद्धता आणि उर्जेचे माध्यम मानले जाते आणि डोक्यावर पाणी घालणे म्हणजे सहस्त्रार चक्र शांत आणि सक्रिय करणे. जेव्हा सहस्त्रार चक्र सक्रिय आणि संतुलित होते, तेव्हा व्यक्ती ब्रह्मांडीय ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकते.
शुद्ध उर्जेचा आणि हलकेपणाचा अनुभव
समजा तुम्ही केस न धुता मंदिरात गेला तर, तुमचे केस आणि मन अनेक नकारात्मक भावनांसह मंदिरात प्रवेश करते. जसे की, राग, चिंता, अहंकार वगैरे. केस धुणे म्हणजे डोक्यातीव नराकात्मर ऊर्जा धूऊन टाकणे. जेव्हा तुम्ही डोक्यावरून स्नान करता, तेव्हा तुम्हाला खूप हलके आणि चांगले वाटते. तुमच्या मनाला देखील शुद्धतेचा अनुभव होतो. तुम्हाला त्या शुद्ध उर्जेचा आणि हलकेपणाचा अनुभव होतो. म्हणूनच संपूर्ण शरीराची स्वच्छता करूनच मंदिरात प्रवेश करणे आणि खास करून केस धुणे विशेष महत्त्वाचे आहे.