आजचे राशिभविष्य, ७ डिसेंबर २०२४ : चंपा षष्ठी! कन्यासह ४ राशींचा मानसिक ताण कमी होईल, पैसे खर्च होतील, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Today Horoscope 7 december in Marathi, आजचे राशीभविष्य:  
आज ७ डिसेंबर असून शनिवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून चंपाषष्ठी आहे. आज खंडोबा देवाची पूजा केली जाईल. धनिष्ठा नक्षत्र असून व्याघात आणि हर्षण योग जुळून आला आहे. गरज करणाचा शुभ संयोग असल्याने आजचे महत्त्व अधिक वाढले आहे. जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ७ डिसेंबर २०२४ : चंपा षष्ठी! कन्यासह ४ राशींचा मानसिक ताण कमी होईल, पैसे खर्च होतील, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 7 december 2024 :
आज ७ डिसेंबर असून शनिवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून चंपाषष्ठी आहे. आज खंडोबा देवाची पूजा केली जाईल. धनिष्ठा नक्षत्र असून व्याघात आणि हर्षण योग जुळून आला आहे. गरज करणाचा शुभ संयोग असल्याने आजचे महत्त्व अधिक वाढले आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहिल. कुटुंबासोबत शुभ कार्यात सहभागी व्हाल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आशीर्वादाने आर्थिक फायदा होईल. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – आर्थिक लाभ होतील

आज नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. तुम्हाला सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहिल. कुटुंबासोबत शुभ कार्यात सहभागी व्हाल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा

वृषभ – खर्चावर नियंत्रण ठेवा

आज कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. तुमच्या जुन्या समस्या दूर होतील. नोकरदार लोक आपली जागा बदलण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आशीर्वादाने आर्थिक फायदा होईल. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.

मिथुन – इच्छुकांचे लग्न होईल

आज विद्यार्थ्यांना आळस सोडून अधिक मेहनत करावी लागेल. परीक्षेत चांगले यश मिळेल. तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे पैसे खर्च होईल. विवाहयोग्य लोकांकडून चांगले विवाह प्रस्ताव येतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

कर्क – प्रगतीतील अडथळे दूर होतील

आज तुम्ही व्यस्त कामात असेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत प्रवासाची योजना आखाल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. प्रगतीतील अडथळे दूर होतील. व्यवसायात मित्रांची गरज भासेल. व्यवसायातील नवीन योजना पुढे नेण्यास सक्षम असाल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

सिंह – वाद होतील

आज तुम्ही व्यवसायात पूर्वी पेक्षा जास्त उत्साहाने काम कराल. तुमची सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. अचानक कुठूनतरी पैसे मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहिल. सासरच्या व्यक्तीशी वाद होतील. बोलण्यात गोडवा ठेवा. नात्यात दूरावा येईल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

कन्या – मानसिक त्रास कमी होईल

आज तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्त व्हाल. मुलांकडून आनंददायक बातम्या मिळतील. बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. वाहन बिघडल्याने पैसे खर्च होतील.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा

तुळ – कामात व्यस्त राहाल

आज मुलांशी संबंधित कोणत्याही गोष्टीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस शुभ राहिल. प्रकृती थोडीशी कमकुवत राहिल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे अन्न खाणे टाळा. नोकरदार लोक कामात व्यस्त असतील. नोकरीच्या ठिकाणी वाद घालणे टाळा.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा

वृश्चिक – पैसे उधार देऊ नका

आज तुमची प्रगती पाहून मन प्रसन्न राहिल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने काम केल्यास यश मिळेल. वडिलांना शारीरिक समस्या जाणवतील. नातेवाईकांकडून मिळालेली माहित फायदेशीर ठरेल. पैसे उधार देऊ नका.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.

धनु – नुकसान होईल

आज तुम्हाला व्यवसायात काही चुकांमुळे नुकसान सहन करावे लागेल. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी वाद होतील. प्रेमजीवनात दूरावा येईल. वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर पडेल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा

मकर – पैसे खर्च होतील

आज तुमच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली जाईल. तुमचे मन प्रसन्न राहिल. शत्रू तुमच्यापासून दूर राहातील. तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. गरजा बघून पैसे खर्च करा. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा

कुंभ – जोडीदाराचे सहकार्य मिळेल

व्यवसायात मेहनत करुन भरपूर पैसे कमवाल. ज्यामुळे फायदा होईल. कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही. त्यामुळे तुमच्यावर रागावतील. तुमचे मत तुम्ही पटवून द्याल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची पूजा करा

मीन – उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील

आज मालमत्तेशी संबंधित वाद संपतील. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. धार्मिक कार्यात श्रद्धा वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Aajche Rashi Bhavishya 7 decemberdaily rashi bhavishya 7 decemberHoroscope Today 7 december In marathimaharashtra times rashi bhavishya todaytoday rashi bhavishya 7 decemberशनिवारचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment