Pushpa 2 Box Office : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवशी अनेक विक्रम रचणाऱ्या ‘पुष्पा २’चे यश दुसऱ्या दिवशीही कायम राहिले आहे. या सिनेमाची कमाई जाणून घेऊ.
हायलाइट्स:
- अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ रिलीज
- पहिल्याच दिवशी सिनेमाने मोडले बरेच रेकॉर्ड
- ‘पुष्पा २’ ने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली
पुष्पा २ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शुक्रवारी ‘पुष्पा २’ ने पाचही भाषांमध्ये मिळून ९०.१ कोटी रुपयांची कमाई केली. त्यातील बहुतेक कलेक्शन हे हिंदीतून झाले. या सिनेमाने हिंदीतून ५५ कोटी रुपये, तेलगूमधून २७.१ कोटी रुपये, तमिळमधून ५.५ कोटी रुपये, कन्नडमधून ६० लाख रुपये आणि मल्याळममधून १.९ कोटी रुपये कमावले आहेत. हे अद्याप प्राथमिक आकडे आहेत. दोन दिवसांत देशभरात ‘पुष्पा २’ची एकूण कमाई २६५ कोटींवर पोहोचली आहे.
दुसऱ्या दिवशी कमाई ४५.१४% कमी झाली
‘पुष्पा २’ च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत त्यात ४५.१४% ने घट झाली. पण पहिल्या वीकेंडमध्ये ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे निश्चित. अल्लु अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने एडव्हान्स बुकिंगमधूनच १०५ कोटी रुपयांचे कमाई केली होती.
पहिल्याच दिवशी या चित्रपटांना टाकले मागे
पुष्पा २ सिनेमाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले. विशेष म्हणजे या सिनेमाने अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई केली. ओपनिंगच्या दिवशीच या सिनेमाने ११ नवीन विक्रम करत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये मागे टाकले. यामध्ये ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘कल्की २८९८ एडी’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
पुष्पा २ चा बॉक्स ऑफिसवर धमाका, ठरला सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट
‘पुष्पा २’ चे जगभरातील कलेक्शन
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या दिवसाची अद्याप समोर आलेली नाही. मात्र हा आकडा ४०० कोटींच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज आहे. ५०० कोटींचे बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा २’ ने पहिल्याच दिवशी जगभरात २७९.२० कोटी रुपयांची कमाई केली. परदेशातील कलेक्शनच्या बाबतीतही या चित्रपटाने RRR, ‘बाहुबली २’ आणि KGF १ ला मागे टाकले.