पुणे : तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख
४० वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रिय क्रीडा स्पर्धा- २०२४
बक्षिस वितरण व समारोप समारंभ


पुणे शहर पोलीस दलातर्फे दि.०७/१२/२०२४ ते दि.११/१२/२०२४ या कालावधीत शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे या ठिकाणी हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, हॅण्डबॉल व कबड्डी इत्यादी स्वरूपाचे सांघिक खेळ, त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरूपाचे रनिंग, कुस्ती, ज्युडो, वेट लिफ्टिींग इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
४० वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-२०२४ करीता पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन, शाखा तसेच मुख्यालय येथे नेमणूकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार स्पर्धक खेळाडू तसेच संघाची निवड करण्यात आली होती.
स्पर्धेत उत्कृष्ट अॅथलेटीक्स म्हणून पुरुष गटामध्ये शुभम दांडगे तसेच महिला गटामध्ये पद्मा कारंडे या स्पर्धकाची निवड करण्यात आली त्यांना मा पोलीस आयुक्त सो. यांचे हस्ते रेसिंग सायकल बक्षिस देवुन सन्मानित करण्यात आले. १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरुषामध्ये विकास इंगळे पुणे शहर व महिलामध्ये निकीता खताळ पिंपरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच पुरुषामध्ये विष्णु जाधव पुणे शहर यांनी तसेच महिलांमध्ये मनिषा लोंढे पुणे शहर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे सांघिक स्पर्धामध्ये सर्वसाधारण विजेतेपद मुख्यालय शिवाजीनगर या संघाने पटकाविले.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम, व्दीतीय, तृतीय क्रमांक पटकाविलेले खेळाडू तसेच विजयी संघाचे प्रतिनिधी यांचा सत्कार मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांचे शुभहस्ते करणेत येवून विजेत्या स्पर्धकांना तसेच संघाना पारितोषीक प्रदान करण्यात आले.
आजच्या क्रिडा स्पर्धेच्या सांगता समारंभापुर्वी रस्सी खेचच्या झालेल्या स्पर्धांमध्ये अधिकारी वर्ग यांना विजेतेपदाचे बक्षिस देण्यात आले.
सदर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचा सांगता समारंभ दि.११/१२/२०२४ रोजी सांय. १६/०० वा.चे सुमारास मुख्यालय, शिवाजीनगर येथे मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांचे हस्ते पार पडला.
या कार्यक्रमास मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. अरविंद चावरीया, श्री. अमोल बालवडकर, श्री. प्रविणकुमार पाटील तसेच पुणे पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचे आगमन आणि मानवंदना झाल्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडुचे संचलन झाले. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी खेळाडुंचे मनोधैर्य वाढेल अशा पध्दतीने आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मा. रंजनकुमार शर्मा सह. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी तर मा. अरविंद चावरीया अपर पो. आयुक्त प्रशासन यांनी आभार प्रदर्शन केले.
अशा प्रकारच्या आयोजित स्पर्धामधूनच उत्कृष्ठ खेळाडू तसेच प्रतिभावंत संघामधूनच महाराष्ट्रातील वेगवेगळे आयुक्तालय, परिक्षेत्रस्तरावर आयोजित स्पर्धेकरीता खेळाडूंची निवड करणेत येते.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच क्रिडा शौकीन व इतर मान्यवर नागरीक हजर होते.