Numerology Prediction, 14 December 2024 : 14 डिसेंबर, आज दत्तजयंती असून दत्तगुरूंचा आशिर्वाद सगळ्यांवर असेल. मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक नाही. रागावर नियंत्रण ठेवा. मूलांक 2 चे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मूलांक 4 च्या लोकांनी अडचणींपासून स्वतःला दूर ठेवा. मूलांक 6 चे वरिष्ठांकडून कौतूक होणार, मूलांक 8 असणाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवा. मूलांक 9 च्या जातकांनी लहान मुलांची काळजी घ्या. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक नाही. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होणार आहे. जर कोणत्याही कामामध्ये वेळ लागत असेल, तर चिंता करू नका, काम होईल.
मूलांक 2 – टेन्शन वाढण्याची शक्यता
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. मुलांबद्दल तुम्ही अधिक विचार करणार आहात. कुटुंबातील कोणाच्या तरी बोलण्यामुळे तुमचे टेन्शन वाढेल. तब्येतीची काळजी घ्या आणि तुमच्या खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
मूलांक 3 – लवलाइफमध्ये अडचणी
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी दिवस ठिक नाही. लवलाइफमध्ये अडचणी आहेत. प्रत्येक कामात अडचणी आहेत. आज जे काही काम करणार आहात त्याच्या आधी गणपतीचे नामास्मरण करावे.
मूलांक 4 – अडचणींपासून स्वतःला दूर ठेवा
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे. काहीही झाले तरी स्वतःला अडचणीत टाकू नका. कामामध्ये वेग आहे त्यामुळे लाभ घ्या, आज जी काही संधी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल.
मूलांक 5 – वस्तू हरविण्याची शक्यता
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक नाही, परिस्थिती तुमच्याविरुद्ध जावू शकते. निरर्थक वादापासून स्वतःला दूर ठेवा. वस्तूंकडे कटाक्षाने लक्ष ठेवा कारण आज गोष्टी हरविण्याची शक्यता आहे.
मूलांक 6 – वरिष्ठांकडून कौतूक होणार
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. जे काही काम करायचे आहे त्याची यादी तयार करा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. मित्रांसोबत मजा करण्याची संधी मिळेल.
मूलांक 7 – सावधगिरीने काम करा
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक नाही. कामात विलंब होणार आहे त्यामुळे कामे थांबतील. सावधगिरीने कामात लक्ष देत राहा आणि शक्य असल्यास दुसऱ्यांवर अधिक विश्वास ठेवू नका. फसवणुकिची शक्यता आहे.
मूलांक 8 – रागावर नियंत्रण ठेवा
मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक आहे. जे योग्य आहे त्याला साथ द्या. काही बाबतीत तुम्ही जिद्दी किंवा क्रोधीत झालात तर लोक तुमच्या विरोधात उभे राहतील. रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 9 – लहान मुलांची काळजी घ्या.
मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे. लहान मुलांची काळजी घ्या. हवामानातील बदलांपासून त्यांचे संरक्षण करा. प्रवासात लाभ आहे. जो काही विचार कराल त्यात यश मिळेल.