Weekly Lucky Zodiacs 16 to 22 December Horoscope : डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रतियुती योग तयार होत आहे. या आठवड्यात गुरु आणि बुध सातव्या घरात असणार आहे. त्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे. मेहनतीचे फळ मिळेल, करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. जाणून घेऊया साप्ताहिक लकी राशीभविष्य
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रतियुती योग तयार होत आहे. या आठवड्यात गुरु आणि बुध सातव्या घरात असणार आहे. त्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे.
गुरु आणि बुधाचा संयोगामुळे ५ राशींचे नशिब पालटणार आहे. ज्ञान, संपत्ती, बुद्धिमत्ता, व्यवसाय या कौशल्य गुणांना अधिक वाव मिळेल. तसेच मिथुनसह ५ राशींना लाभ होईल. मेहनतीचे फळ मिळेल, करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. जाणून घेऊया साप्ताहिक लकी राशीभविष्य
मिथुन साप्ताहिक लकी राशीभविष्य
या आठवड्यात तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रखडलेल्या कामांना गती मिळेल. जमीन, मालमत्ता आणि वैयक्तिक संबंधांची प्रकरणे कोर्टाच्या बाहेर सोडवा. तरुणाई बराच वेळ मौजमजेत घालवेल. अनुभवी लोकांकडून महत्तवाचा सल्ला मिळेल. नोकरदार लोकांना मेहनतीचे फळ मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.
कर्क साप्ताहिक लकी राशीभविष्य
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. तुम्ही या काळात मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवू शकता. या आठवड्यात गुंतवणूक केल्याने भविष्यात मोठा फायदा होईल. व्यापारी वर्गाला नफा मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळेल. अचानक प्रवास करावा लागू शकतो.
तुळ साप्ताहिक लकी राशीभविष्य
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे. आर्थिक परिस्थितीतून तुमची सुटका होईल. या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत होईल. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे. कोर्टातील निर्णय तुमच्या बाजूने लागेल. प्रेम विवाहतील लोकांना यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने आनंदी असाल.
वृश्चिक साप्ताहिक लकी राशीभविष्य
वृश्चिक राशीच्या लोकांनी कल्पनेच्या जगातून बाहेर पडायला हवे. तुम्हाला समर्पण केल्यावर मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंदी असाल. तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. स्वत:ला अधिक सकारात्मक ठेवा.
धनु साप्ताहिक लकी राशीभविष्य
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्व कामे पूर्ण करावी लागतील. या आठवड्यात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. तरुणांसाठी हा आठवडा मज्जा मस्तीचा असेल. स्त्रीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या आणि अनुभवी व्यक्तीच्या मदतीने चांगले परिणाम मिळतील.