‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वीकेंड असो किंवा इतर दिवस, चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. पुष्पा २ सिनेमा भारतात १००० कोटी रुपये कमावणार आहे. या सिनेमाने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा 2 ने याआधीच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले असून आता एसएस राजामौली यांच्या आरआरआरचाही या यादीत समावेश झाला आहे. तसंच हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे, त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर येण्यास फारसा वेळ लागणार नाही.

पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचं झाल्यास, या सिनेमाने KGF चॅप्टर 2 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे. लोक हा चित्रपट एकदा नाही तर २-३ वेळा पाहत असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समजून आलंय.

‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

RRR चा रेकॉर्ड मोडला

Sacnilkच्या रिपोर्टनुसार, पुष्पा २ने जगभरात १३२२ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने RRR KGF Chapter 2 ला मागे टाकून तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. RRR सिनेमाचं कलेक्शन १२३० कोटी आहे आणि KGF चॅप्टर २चं कलेक्शन १२१५ कोटी आहे. त्याचबरोबर बाहुबली २ने १७९० कोटींची कमाई केली होती तर दंगलने २०७० कोटींची कमाई केलीये. त्यामुळे अल्लू अर्जुनचा पुष्पा २ सिनेमा लवकरच लांबचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.

पुष्पा २ने भारतात जवळपास ९२९ कोटींची कमाई केली असून या सिनेमाला १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
CM चा लेक म्हणजे तो बिघडलेलाच! जिनिलियाचा पहिल्या भेटीत झालेला गैरसमज, असं फुललं रितेशसोबतचं नातं
दरम्यान, पुष्पा २ सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. चाहत्यांना या चित्रपटाचं वेड लागलं असून या सिनेमाला पहिल्या भागापासून ते दुसऱ्या भागापर्यंत प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात पुष्पाच्या तिसऱ्या भागाची उत्कंठा वाढली असून तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

allu arjun pushpa 2pushpa 2 latest newspushpa 2 release datepushpa 2 worldwide box office collectionअल्लू अर्जुनअल्लू अर्जुन पुष्पा २पुष्पा २पुष्पा २ कमाई
Comments (0)
Add Comment