upcoming multi starrer marathi movie: मराठी चित्रपटसृष्टी नव वर्षात ‘मल्टिस्टारर’ सिनेमांमुळे उत्साहात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्येच एकाहून एक दमदार, तगडे कलाकार रसिकांच्या भेटीला येणार आहे. एरवी बॉलिवूड नववर्षातल्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा आधीच जाहीर करतात; यंदा मात्र मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. आघाडीच्या कलाकारांच्या सिनेमांची मेजवानी घेऊन मराठी चित्रपटसृष्टी नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करणार आहे.
नववर्षात पहिल्या महिन्यातच १२ मराठी सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. एखादा आठवडा वगळल्यास प्रत्येक आठवड्यात दोन-तीन सिनेमे एकत्र बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. तसंच फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत ६ मराठी सिनेमांचं प्रदर्शन ठरलंय. अर्थात २०२५च्या पहिल्या सात आठवड्यात एकूण १८ मराठी सिनेमे प्रदर्शनासाठी रांगेत आहेत. विविधांगी विषयांचा सुंदर मिलाफ आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
हेही आगामी सिनेमे :
‘रावसाहेब’, ‘अशी ही जमवाजमवी’, ‘येरे येरे पैसा ३’, ‘निरवधी’, ‘असंभव’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘महापरिनिर्वाण’, ‘बंजारा’, ‘गुलकंद’, ‘देवमाणूस’, ‘सुशीला सुजित’, ‘बंजारा’, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘इंदुमती मिलर’, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’, ‘कलावती’, ‘बोहाडा’, ‘भूपती’, ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’, ‘फकिरा’.
एकत्र येणार स्टार मंडळी !
प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, दीप्ती लेलेपासून अनेक कलंदर कलाकार एकत्र ‘मु. पो. बोंबिलवाडी’ मध्ये भेटीला येणार आहेत. ‘संगीत मानापमान’ मध्ये मल्टिस्टारर कलाकारांची फळी आहेच; त्याशिवाय दमदार गायक-संगीतकारही सिनेमाला लाभले आहेत. संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी या सिनेमासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी संगीतबद्ध केली आहेत. ‘जिलबी’मध्ये स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओके, ‘फसक्लास दाभाडे’मध्ये अमेय वाघ, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, ‘बोल बोल राणी’ मध्ये सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे हे आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना जगभरातल्या सिनेमांची सवय झाली आहे. अशा परिस्थितीत मोठे कलाकार आणि दमदार कथा असलेल्या मल्टिस्टारर सिनेमांना थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
नवीन वर्षांत मराठी सिनेमांची परीक्षा, पहिल्या सात आठवड्यांत १८ मोठे ‘मल्टिस्टारर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
वर्षांरंभी मनोरंजनाचा धमाका !
■ १ जानेवारी: मु. पो. बोंबिलवाडी
■ १० जानेवारी: संगीत मानापमान, एक राधा एक मीरा, जंतर मंतर छूमंतर
■ १७ जानेवारी : जिलेबी, रील स्टार, मंगला
■ २४ जानेवारी : फसक्लास दाभाडे, मिशन अयोध्या
■ ३१ जानेवारी : इलू इलू, मु. पो. देवाचं घर, अष्टपादी
■ ७ फेब्रुवारी : बोल बोल राणी, लव्ह सुलभ, मी पाठीशी आहे, स लातेसला नाते
■ १४ फेब्रुवारी : वीर मुरारबाजी, प्रेमाची गोष्ट २