Lakshmi Narayan Yog 2025 : लक्ष्मीनारायण योग! नवीन वर्षात कर्कसह ५ राशींवर देवी लक्ष्मीची कृपा! आर्थिक संपत्तीत भरमसाठ वाढ

Budh-Shukra Yuti In Meen Rashi 2025 Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ च्या नवीन वर्षात गजकेसरी योगासोबत लक्ष्मीनारायण राजयोग देखील तयार होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात बुध आणि शुक्राचा संयोग होणार आहे. २७ फेब्रुवारी ते ६ मे हा काळ कन्या, मीन राशीसह ५ राशींसाठी लकी ठरणार आहे. लक्ष्मीनारायण योगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Lakshmi Narayan Yog 2025 : लक्ष्मीनारायण योग! नवीन वर्षात कर्कसह ५ राशींवर देवी लक्ष्मीची कृपा! आर्थिक संपत्तीत भरमसाठ वाढ

Budh-Shukra Yuti In Meen Rashi 2025 :
ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ च्या नवीन वर्षात गजकेसरी योगासोबत लक्ष्मीनारायण राजयोग देखील तयार होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात बुध आणि शुक्राचा संयोग होणार आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ ला बुध मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र आधीच असल्यामुळे दोन्ही ग्रह वक्री होऊन मीन राशीत प्रवेश करतील. ७ मे ला सकाळी बुध मेष राशीत प्रवेश करेल, तर शुक्र ग्रह ३१ मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल. २७ फेब्रुवारी ते ६ मे हा काळ कन्या, मीन राशीसह ५ राशींसाठी लकी ठरणार आहे. लक्ष्मीनारायण योगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घेऊया.

मिथुन राशीवर लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव

लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांची प्रगती होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल.

कर्क राशीवर लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव

कर्क राशीच्या लोकांची पैशांशी संबंधित समस्यांपासून सुटका होईल. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरु असलेल्या समस्यांपासून सुटका होईल. नवीन वर्षात तुमच्या आनंदात वाढ होईल. घरामध्ये काही शुभ घटना घडतील.

कन्या राशीवर लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव

लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. पैशांमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक राशीवर लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव

लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळतील. तुम्ही पैशांची चांगली बचत कराल. व्यावसायिक लोक आर्थिक बाबतीत मजबूत होतील. नोकरदार लोकांचे नवीन वर्षात अधिकारी आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहातील. करिअरच्या प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्तुळ वाढेल.

मीन राशीवर लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव

मीन राशीच्या लोकांचा नवीन वर्षात अधिक कल धार्मिक कार्याकडे असेल. कुटुंबातील सदस्य तीर्थक्षेत्राला जाण्याचीही शक्यता आहे. नवीन वर्षात नोकरदार लोकांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घ्याल. इच्छुकांचे लग्न जमेल.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

नवीन वर्षात लक्ष्मीनारायण राजयोगबुध-शुक्राचे मीन राशीत संक्रमणलक्ष्मीनारायण योगात ५ राशी लकी
Comments (0)
Add Comment