mercury transit 2025 sagittarius : ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. अशातच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुधाचे धनु राशीत संक्रमण होईल. ४ जानेवरीला बुध गुरुच्या धनु राशीत प्रवेश करेल. बुधाचे संक्रमण मिथुनसह कोणत्या ५ राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. अशातच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुधाचे धनु राशीत संक्रमण होईल. ४ जानेवरीला बुध गुरुच्या धनु राशीत प्रवेश करेल.
धनु राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. या दोन्ही ग्रहांच्या शुभ संयोगामुळे पहिल्या महिन्यात अनेक राशी धनवान बनतील. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये उत्तम यश आणि प्रगती मिळेल. बुधाच्या मजबूत स्थितीमुळे व्यापार भरभराटी होईल. ज्ञान आणि यश मिळेल. बुधाचे संक्रमण मिथुनसह कोणत्या ५ राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे जाणून घेऊया.
मेष राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
मेष राशीच्या नवव्या घरात बुधाचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात वडिलांच्या मदतीने मोठे यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांना गती द्याल. ज्यामुळे करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही खूप धार्मिक गोष्टीत सहभागी व्हाल. मुलांच्या शिक्षणात यश मिळेल.
मिथुन राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
मिथुन राशीसाठी बुधाचे संक्रमण सातव्या घरात असणार आहे. बुधाचे संक्रमण मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. कुटुंब आणि जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल. या काळात तुम्हाला प्रवास करावा लागेल. त्यातून चांगला नफा होईल. करिअरमध्ये वरिष्ठांशी संबंध अधिक घट्ट होतील. नोकरदार लोकांना फायदा होईल. व्यावसायिकांना पार्टनरशीपमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागेल.
सिंह राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
सिंह राशीत बुधाचे संक्रमण पाचव्या स्थानात होणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये तुम्हाला समाधान मिळेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळेल. या काळात तुम्ही बचत अधिक कराल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहातील. आरोग्य तंदुरुस्त असेल.
धनु राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
धनु राशीच्या लोकांच्या पहिल्या स्थानात बुधाचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. आरोग्याच्या समस्यांपासून तुमची सुटका होईल. पार्टनरशीपमध्ये तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे संबंध सुधारतील. पार्टनरशीपमध्ये पाठिंबा मिळेल. निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने घ्याल.
मीन राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
मीन राशीत बुधाचे संक्रमण दहाव्या घरात होणार आहे. या काळात तुम्हाला अधिक प्रवास करावा लागू शकतो. या काळात कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. नोकरी बदलण्यासाठी हा काळ चांगला आहे. व्यावसायिक पार्टनरशीपमध्ये अधिक लाभ होतील. तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. नातेसंबंधात अधिक आनंदी असाल.