नाना पाटेकऱ्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांची नापसंती; सिनेमागृह रिकामी, फक्त एवढीच कमाई

Vanvaas Movie Box Office Collection Day 2 : नाना पाटेकरांच्या ‘वनवास’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाहीये. जाणून घ्या या सिनेमाचं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – गदर 2 फेम दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा चित्रपट वनवास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. मात्र नाना पाटेकर यांच्या सिनेमाला विशेष प्रतिसाद मिळाला नसून आता कलेक्शनही चांगलं झालं नाहीये. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६० लाखांची कमाई केली होती. आता सिनेमाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया.

नाना पाटेकऱ्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांची नापसंती; सिनेमागृह रिकामी, फक्त एवढीच कमाई

वनवास सिनेमाची दोन दिवसाची कमाई

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली असली तरी कमाई फारशी झालेली नाही. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली आहे. पण जर या सिनेमाने ९५ लाखांची कमाई केली तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन १ कोटी ५५ लाख रुपये होईल.

‘वनवास’ हा सिनेमा अनिल शर्मा यांनी तयार केला आहे. या चित्रपटात राजपाल यादव आणि सिमरत कौरसारखे स्टार्सही आहेत. हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली, पण त्याचा फायदा चित्रपटाला झाला नाही. वनवासासोबतच मुफासा : द लायन किंग हा चित्रपटही प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुफसामुळे वनवास सिनेमाच्या कमाईवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनचा पुष्पा २सुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्यामुळे या सर्व सिनेमांचा परिणाम वनवास चित्रपटावर होतोय.
‘एक अभिनेत्री शाहरुखला ‘हकला’ बोलली होती’ किंग खानबद्दल अभिजीत भट्टाचार्य यांचा धक्कादायक दावा
दरम्यान, वनवास सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या उत्कर्षच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने ‘गदर’ या सिनेमामध्ये काम केलं होतं. या सिनेमाने त्याला प्रसिद्धी मिळाली. गदरमध्ये तो सनी देओलच्या मुलाच्या भूमिकेत होता. गदर 2 मध्ये सनी देओलने त्याला वाचवण्यासाठी पाकिस्तान गाठला होता. उत्कर्ष शर्मा हा गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

nana patekar latest movienana patekar latest newsvanvaas movie box office collection day 2vanvaas release dateनाना पाटेकरनाना पाटेकर बातमीनाना पाटेकर वनवासनाना पाटेकर सिनेमा
Comments (0)
Add Comment