Today Panchang 24 December 2024 in Marathi: मंगळवार, २४ डिसेंबर २०२४, भारतीय सौर ३ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण नवमी सायं. ७-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त दुपारी १२-१६ पर्यंत, चंद्रराशी: कन्या उत्तररात्री १-४९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मूळ
नवमी तिथी सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ, हस्त नक्षत्र दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, शोभन योग रात्री ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, गर करण सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुळ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१०
- सूर्यास्त: सायं. ६-०७
- चंद्रोदय: उत्तररात्री २-०७
- चंद्रास्त: दुपारी १-१८
- पूर्ण भरती: पहाटे ५-४३ पाण्याची उंची ३.५३ मीटर, सायं. ७-५२ पाण्याची उंची ३.१५ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-४९ पाण्याची उंची १.७० मीटर, उत्तररात्री १-०५ पाण्याची उंची २.६१ मीटर
- सण आणि व्रत : शोभन योग, शुभ योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २५ मिनिटांपासून ते ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ११ मिनिटांपासून ते २ वाजून ५३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ३ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून १९ मिनिटांपासून ते १० वाजेपर्यंत.
आजचा उपाय
बजरंगबली हनुमान यांना इत्र आणि तुळशीचा हार अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)