ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने प्रतिभावंत, विचारशील दिग्दर्शक गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद




मुंबई, दि. 23 :- “आपल्या प्रतिभाशाली दिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटक्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनानं बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. सामाजिक भान राखून त्या धाटणीचे सर्वस्पर्शी चित्रपट बनवण्यात बेनेगल यांचा हातखंडा होता. ‘अंकुर’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘निशांत’, ‘मंथन’ या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम स्मरणात राहतील. भारतीय चित्रपटविश्वाला समृद्धता, नवी उंची प्राप्त करून देण्यात बेनेगल यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचं निधन ही भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी आहे. मी श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बेनेगल कुटुंबियांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

***







Source link

Comments (0)
Add Comment