Today Horoscope 24 december in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज मंगळवार २४ डिसेंबर कन्या राशीत चंद्र असणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी असून शोभन योग, वणिज करण आणि हस्त ननक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ४ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. कौटुंबिक खर्चात वाढ झाल्याने मानसिक दडपण येईल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.
आज मंगळवार २४ डिसेंबर कन्या राशीत चंद्र असणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी असून शोभन योग, वणिज करण आणि हस्त ननक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ४ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. कौटुंबिक खर्चात वाढ झाल्याने मानसिक दडपण येईल. तुम्हाला थोडी चिंता सतावेल. व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा. काही नवीन काम सुरु करायचे असेल तर आजचा दिवस चांगला असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. काळजीपूर्वक काम करा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – खर्चात वाढ
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही दुसऱ्यांचा सल्ला घ्याल. कौटुंबिक खर्चात वाढ झाल्याने मानसिक दडपण येईल. तुम्हाला थोडी चिंता सतावेल. व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा. जोखमीच्या गुंतवणुकीत पैसे गुंतवणे टाळा.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा
वृषभ – समस्या येतील
आज व्यावसायिकांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. ज्यासाठी पैसे खर्च होतील. भावंडांचा सल्ला घ्या. काही नवीन काम सुरु करायचे असेल तर आजचा दिवस चांगला असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. काळजीपूर्वक काम करा.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचे पठण करा.
मिथुन – वाद होतील
आज तुम्हाला मुलांच्या कृतीतून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमचे मनोबल वाढेल. मित्रांसोबत सहलीला जाण्याचा विचार कराल. तुमची प्रिय वस्तू हरवेल. नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा वाद होतील.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा
कर्क – आरोग्याची काळजी घ्या
आज सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमचा सन्मान वाढेल. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. आज जोडीदाराची कुटुंबासोबत ओळख करुन द्याल. आईच्या आरोग्याबाबत सावध राहा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा
सिंह – पैसे खर्च होतील
आज तुमचे सुखसोयींवर पैसे खर्च केल्याने मन प्रसन्न राहिल. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. नोकरी आणि व्यवसायात विरोधकांपासून सावध राहा. वाद घालणे टाळा. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करु शकता. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ शकता.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल.
कन्या – बोलण्यात सौम्यता ठेवा.
वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील. एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांशी मतभेद होतील. बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. व्यवसायात पार्टनरशीप करण्याचा विचार करत असाल दिवस चांगला जाईल. तुमचा आजार वाढू शकतो.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा
तुळ – चर्चा कराल
आज तुम्हाला मित्राच्या समस्या सोडवण्यात व्यस्त असाल. कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. जोडीदार तुमच्यावर रागवू शकतो. जोडीदाराला मनवण्याचा प्रयत्न कराल. भविष्याबद्दल भावंडांशी चर्चा कराल. ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होईल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
वृश्चिक – तोटा होईल
आज रखडलेले काम पूर्ण करण्यात व्यस्त असाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात शिक्षकांची गरज भासेल. सल्ला न घेता गुंतवणूक करु नका. तोटा होण्याची शक्यता अधिक आहे. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा
धनु – मोठा निर्णय घ्याल
आज मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गोष्टी तपासून घ्या. व्यवसायात शत्रूंवर विजय मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. प्रेम जीवनात नवीन ऊर्जा येईल. मुलांच्या भविष्याशी संबंधित मोठा निर्णय घ्याल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्नवस्त्र दान करा.
मकर – आरोग्याची काळजी घ्या
आज सरकारी काम उच्च अधिकाऱ्याच्या कृपेने पूर्ण होईल. कौटुंबिक कलह नव्याने वर येतील. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना परीश्रम घ्यावे लागतील.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी-खडीसाखर अर्पण करा
कुंभ – बढती मिळेल
पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला राहिल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळेल. यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. प्रगतीच्या विशेष संधी मिळतील. तुमचे मन धार्मिक कार्यात गुंतवाल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.
मीन – मन प्रसन्न राहिल
आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. शत्रूही तुमचे मित्र बनतील. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरीच्या क्षेत्रात असणाऱ्यांना समस्यांपासून आराम मिळेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा