Astrological Prediction 2025 : वर्ष 2025 च्या वार्षिक कुंडली अनुसार या वर्षीचा राजा मंगळ आणि सूर्य आहे. तसेच या वर्षी शनि, गुरु, राहू-केतु आणि इतर अनेक मोठे ग्रहं परिवर्तन करणार आहेत, त्यामुळे 2025 मध्ये अनेक मोठ्या घटना घडतील ज्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटतील. नैतिक आपत्तीसह राजकीय उलथापालथ तसेच हवामानातील बदल पहायला मिळेल, चला तर 2025 मध्ये देश विदेशात काही मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सत्ताधारी पक्ष अधिक प्रभावी
2025 मध्ये ग्रहांची स्थिती पाहता भारतीय राजकारणात सत्ताधारी पक्ष अधिक प्रभावी असेल. विरोधकांचा तणाव वाढेल तसेच आरोप-प्रत्यारोपांचा स्तर आणखी खालच्या पातळीवर येणार आहे.
आध्यात्मिक मार्गावर वाटचाल
ग्रहांचे संक्रमण तसेच युती यामुळे वर्ष 2025 मध्ये लोकांचा ओढा आध्यात्माकडे असेल. लोकांच्या मनातील राग आणि आक्रोश अधिक वाढेल. देशात मोठं मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते.
लूटमार, चोरीसह अपराधांमध्ये वाढ
ग्रहांची स्थिती असेही सांगत आहे की देशातील अनेक भागात समस्या निर्माण होऊ शकतात. एकमेकांना समजून घेणे किंवा मदत करणे यांचा अभाव जाणवेल. सरकार कठोर धोरण आणि नियम आणेल तरी लूटमार, चोरी आणि अपराधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
राजकीय घडामोडींना वेग
2025 मध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. अनेक राज्यांमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता असून जून ते ऑक्टोबर दरम्यान स्थिती विचित्र असू शकते. काही घटनांमुळे जगाला देखील आश्चर्य वाटेल. प्रत्यक्षात, 15 मार्च ते 11 जून दरम्यान खप्पर योग बनणार आहे. त्यानंतर 11 जुलै ते 7 ऑक्टोबर पर्यंतही खप्पर योग सक्रिय असेल.
अमेरिका- रशियाच्या संबंधात तणाव
2025 मध्ये अमेरिका आणि रशियाच्या दरम्यान तणावपूर्ण संबंध राहतील. पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये युद्धाची स्थिती गंभीर होऊ शकते. मार्च आणि मे महिन्यात अमेरिका, इराण, लेबनॉन, सीरिया, इस्राएल, चीन, तसेच अनेक युरोपीय देशांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे ज्याचा प्रभाव जागतिक राजकारणावर होईल.
क्रूड ऑईलच्या किमतीत अचानक वाढ
वर्ष 2025 मे ते जुलैच्या दरम्यान क्रूड ऑईलच्या किमतीत अचानक वाढ होऊ शकते. तर काही ठिकाणी दुष्काळ किंवा पूर येणे अशा दुर्घटना घडू शकतात. उष्णता आणि बदलते हवामान यामुळे जनता त्रस्त होणार आहे. विविध ठिकाणी अनेक प्रकारच्या नैतिक दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
डोळ्यांचे विकार वाढण्याची शक्यता
वर्ष 2025 मध्ये सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, ज्याचा राशी स्वामी ग्रह सूर्य आहे त्यांना डोळ्यांचे आजर होण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये डोळ्यांचे विकार वाढण्याची शक्यता आहे. हृदयाचे आजार देखील जास्त वाढतील अशी शक्यता आहे.