Christmas Tree Vastu Tips: २५ डिसेंबर म्हणजे नाताळ, ख्रिसमस….तुम्ही कोणतेही नाव द्या, हा सण जगभरात आनंद आणि उत्साह घेवून येतो. ख्रिसमसमध्ये डेकोरेशला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण ख्रिसमसमधील सजावट असे म्हणतो त्यावेळी डोळ्यासमोर येतो ख्रिसमस ट्री. घराघरात, ऑफिसमध्ये, दुकानात नाताळच्यावेळी ख्रिसमस ट्री आपल्याला पहायला मिळतो. त्याची खास सजावट केली जाते. तुम्ही ख्रिसमस ट्री वास्तूच्या नियमानुसार ठेवला तर तुमच्या जीवनातील आनंद अधीक द्विगुणीत होईल, यात शंकाच नाही.
ख्रिसमस ट्री म्हणजे ‘स्वर्गातील झाडं’
अनेक ग्रंथांमध्ये ख्रिसमस ट्रीचा उल्लेख ‘स्वर्गातील झाडं’ असे केले आहे. तसं पाहिलं तर मानवासाठी झाडे खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. नाताळच्या काळात ख्रिसमस ट्री घरात ठेवला तर घरातील नकारात्कम ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. वास्तूशास्त्रानुसार एखादी वस्तू नियमानुसार ठेवली तर ती अधिक फलदायी असते.
कोणत्या दिशेला ठेवावा ख्रिसमस ट्री?
तुम्ही ख्रिसमस ट्री कोणत्या दिशेला ठेवत आहात ते महत्त्वाचे आहे. योग्य दिशेला ख्रिसमस ट्री ठेवला तर जीवनातील समस्या कमी होवू शकतात. वास्तूशास्त्रानुसार ख्रिसमस ट्री घराच्या उत्तर दिशेत ठेवणे शुभ मानले जाते. जर उत्तर दिशेत ट्री ठेवणे शक्य नसेल, तर उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ख्रिसमस ट्री ठेवू शकता.
कोणत्या रंगाच्या लाईट्स वापराव्यात?
ख्रिसमस ट्रीला खूप सजवलेले असते. त्यावर जिंगलबेल, गिफ्ट लावलेली असतात. तसेच लाईट्स सोडलेल्या असतात. ख्रिसमस ट्रीची सजावट करताना त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या लाईट्सचा वापर करावा. हे रंग प्रेम आणि मैत्रीचे प्रतिक असल्यामुळे घरातही वातावरण प्रेमाने भरलेले राहते. तसेच ख्रिसमस ट्रीच्या आसपास मेणबत्ती प्रज्वलीत करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते.
ख्रिसमस ट्री मुख्य दरवाजासमोर नको.
ख्रिसमस ट्री तुम्ही मुख्य दरवाजासमोर ठेवू नका. तुम्ही असे केले तर वास्तूनुसार त्याचा अर्थ एक झाड असा होतो आणि वास्तूशास्त्रात झाड कधीही मुख्य दरवाजासमोर ठेवले जात नाही. झाड जर मुख्य दरवाजासमोर असेल तर सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.
या ठिकाणी ठेवू नका ख्रिसमस ट्री
एखाद्या खांबाजवळ किंवा जी जागा अस्वच्छ आहे तसेच मुख्य दरवाजासमोर ख्रिसमस ट्री ठेवला तर घरात नकारात्मक उर्जा वाढते. ख्रिसमस ट्रीला दक्षिण दिशेला ठेवणे देखील अशुभ मानले जाते.